सावंतवाडी : मागासवर्गीय सेलच्या युवासेना तालुका प्रमुख पदी शेर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांची आज निवड करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष हर्षद ढेरे, तालुकाध्यक्ष बबन राणे, झेवियर फर्नांडिस, प्रेमानंद देसाई, गजानन नाटेकर, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, गुंडू जाधव, श्री. कुबल यांसह अन्य उपस्थित होते. प्रशांत जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन पक्ष संघटना व युवक संघटना वाढवण्यासाठी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.


