- संजय पिळणकर
सावंतवाडी : १ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा केला जातो.या दिवशी ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन मेळावा, बैठकीचे आयोजन करतात. परंतु सातोसे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी हा दिन पणदूर येथील आनंदाश्रयातील निराधारांसमवेत साजरा करताना त्यांना जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली.तर श्रीराम प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय पिळणकर यांनी निराधारांना साड्या वाटप केले. या स्तुत्य उपक्रमाचे आनंदाश्रयाचे सर्वेसर्वा संदीप परब यांनी कौतुक करताना निराधारांच्या मागे असे ज्येष्ठ नागरिक उभे राहत असल्याचे पाहून खूप समाधान वाटते,असे मत व्यक्त केले.

यावेळी सातोसे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास मयेकर, उपाध्यक्ष शशिकांत (जीजी) मांजरेकर,सचिव गोविंद पेडणेकर, खजिनदार बबन सातोसकर, संतोष शिरोडकर,विश्वनाथ परब, भगवान रेडकर,अर्जुन नाईक,उत्तम शिरोडकर,सुधाकर मांजरेकर, गुरूदास साळगावकर,लक्ष्मण जाधव,एकनाथ भगत,मोहन गडेकर,सुभाष पेडणेकर,उपसरपंच रुपेश साळगावकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय पिळणकर यांनी केले.


