सावंतवाडी : येथील मातृभूमी शिक्षण संस्था संचलित शिव संस्कार आयोजित सन्मान सोहळा बॅ.नाथ पै सभागृह , सावंतवाडी येथे नुकताच पार पडला. शिवसंस्कार अंतर्गत विविध स्पर्धांमध्ये मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये कु. पियुष निर्गुण याने चित्रकला स्पर्धेत (अफजलखान वध) प्रथम क्रमांक, राजमाता जिजाऊ साहेब वेशभूषा स्पर्धेमध्ये मोठ्या गटातून केतकी बागवे हिने उत्तेजनार्थ , स्वराज्य संकल्पक शहाजी राजे निबंध स्पर्धेमध्ये श्रेयस रेडकर याने तृतीय क्रमांक,महाराणी ताराबाई वेशभूषा स्पर्धेमध्ये कु. युक्ता सापळे हिने प्रथम क्रमांक तर याच स्पर्धेमध्ये कु. अनिषा ठाकूर हिने उत्तेजनार्थ, वक्तृत्व स्पर्धेत (शिवरायांचे अचूक नियोजन अफजलखान वध) कु. श्रेयस रेडकर याने द्वितीय क्रमांक पटकावला.

तसेच शिवचरित्र लेखी परीक्षेमध्ये कु.समिक्षा केसरकर ९५ गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. तर किमया केसरकर ९२ गुण, कु.मृण्मय शिरोडकर ९१ गुण , कु. समृद्धी मडगावकर ९० गुण, कु दुर्गाराम कुडतरकर ९० गुण , कु ब्रम्ही निवेलकर ८८ गुण , कु.स्वरा टिळवे ८७ गुण, कु.राधिका सोनाळकर ८६ गुण , कु विभव राऊळ ८६ गुण, कु .नेहल मठकर ८५ गुण मिळवून या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ क्रमांकाची पारितोषिके पटकावली.
तसेच विशेष व अभिमानास्पद बाब म्हणजे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर यांचा शिवचरित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड.शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ. सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


