Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

क्रिटीकल केअर ब्लॉक रुग्णालयाचे काम दर्जेदार व मुदतीत पूर्ण करा! – पालक सचिव विरेंद्र सिंह यांचे निर्देश.

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या उन्नतीसाठी सुरू असलेल्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेताना जिल्ह्याचे पालक सचिव तथा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी आयुष इमारत, क्रिटिकल केअर ब्लॉक (सी.सी.बी.एच.) हॉस्पिटल बांधकाम जागा आणि जिल्हा औषध भांडार येथे भेट देऊन सखोल पाहणी केली. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण मुंबई यांच्या अधिपत्याखालील जिल्हा औषध भांडार याची उभारणी करीता आवश्यक जागा जिल्हा मुख्यालयात उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिल्या. हे जिल्हा औषध भांडार जिल्हा शल्य चिकीत्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आरोग्य संस्थांकरीता कार्यरत असणार आहेत.

या पाहणीदरम्यान श्री. सिंह यांनी क्रिटिकल केअर ब्लॉकच्या बांधकामाविषयी अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी कामाच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली आणि बांधकाम निर्धारित मुदतीत व उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.


यावेळी ते म्हणाले की, शासनाच्या सर्व आरोग्य योजना आणि सेवा या नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एकत्रितपणे समन्वयाने काम करणे अत्यावश्यक आहे.
यानंतर त्यांनी आयुष इमारतीची पाहणी केली. सध्या या इमारतीत अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे कार्यालय व आस्थापना कार्यरत आहेत. मात्र, इमारत तयार असूनही रुग्णालयाचे कामकाज सुरू झालेले नाही, याची त्यांनी नोंद घेतली. या संदर्भात श्री. सिंह यांनी अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक आणि बांधकाम विभाग यांच्यासोबत संयुक्त चर्चा करून इमारतीचा काही भाग आयुष विभागासाठी वापरात आणून रुग्णालय त्वरित कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या.
ए.आय. सिंधुदुर्ग प्रकल्पांतर्गत आरोग्य विभागाने विकसित केलेल्या दोन अॅप्लिकेशन्स तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे संकेतस्थळ व डॅशबोर्ड यांचे प्रात्यक्षिक श्री. सिंह यांना सादर करण्यात आले. त्यांनी या तंत्रज्ञानाधारित उपक्रमांचे कौतुक करत डिजिटल आरोग्य सेवांना अधिक प्रभावी बनविण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण, अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles