Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत पालक सचिव आले अन्…. ; सावंतवाडीकरांमध्ये तीव्र नाराजी!

सावंतवाडी : सिंधुदुर्गचे पालक सचिव तथा आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन सचिव, सिंधुदुर्गचे तत्कालीन जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह यांनी आज जिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे भेट दिली. नियोजित दौरा उद्याचा असताना ते आजचं आले. त्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांचा आढावा घेतला. पत्रकारांनी प्रतिक्रिया मागीतली असता त्यांनी न बोलणं पसंत केले. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनाही अपेक्षित उत्तरं न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती गंभीर आहे. आकृतीबंधात मंजूर डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या निम्मा स्टाफ इथे नाही. असणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी सेवा देतात. मात्र, हार्ट फिजीशीयन, ट्रामा केअर युनिट’मधील पद रिक्त असल्याने गोवा बांबोळीची वारी करावी लागते. याबाबत गेल्या चार दशकांपासून विविध आंदोलने, मोर्चे, निदर्शन झाली. मात्र, परिस्थिती तशीच आहे. अभिनव फाउंडेशनने याबाबत जनहित याचिका दाखल करून १० वर्ष झाली असून हा खटला कोल्हापूर खंडपीठात सुरू आहे. न्यायालयाने ताशेरे ओढताच राज्याचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. उप महासंचालकानंतर आज खुद्द आरोग्य विभाग सचिव श्री. सिंह यांनी सावंतवाडी गाठत येथील परिस्थितीची पहाणी केली.

त्यांनी येथील प्रसुती गृह, मोड्युलर आय.सी.यू, ऑपरेशन थिएटर, टेलिमेडीसीन विभाग, रक्तपेढी, ट्रामा केअर युनिट, डायलेसीस सेंटरसह सगळ्या विभागाला भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे आदीसह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

दरम्यान, दौरा उद्याचा असताना आजच त्यांनी ही भेट दिली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांचा पाढा सामाजिक कार्यकर्ते ॲड नकुल पार्सेकर, ॲड संजू शिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी त्यांच्यासमोर मांडला. सामाजिक कार्यकर्ते श्री. जाधव यांनी उपचारा विना जाणारे जीव आम्ही डोळ्यांदेखत पाहिलेत असं गाऱ्हाणे मांडल. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ॲड. नंदन वेंगुर्लेकर, ॲड. नकुल पार्सेकर, ॲड. संजू शिरोडकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सुर्याजी, रवी जाधव, समीरा खलील, रूपा मुद्राळे, अभिनव फाउंडेशनचे अण्णा म्हापसेकर, किशोर चिटणीस, राजू केळूसकर आदी उपस्थित होते‌.

दरम्यान, श्री. सिंह हे जिल्हाधिकारी असतानाच आम्ही जनहित याचिका दाखल केली. त्यावेळी त्यांनी उपोषण न करण्यासाठी आश्वासनही दिल होत. आज योगायोगाने तेच आरोग्य सचिव आहेत. त्यांना येथील आरोग्य समस्या माहिती आहेत. त्यांना निवेदन दिलं असता अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे अभिनव फाउंडेशनचे सचिव अण्णा म्हापसेकर यांनी सांगितले. अँड. पार्सेकर म्हणाले, ते इथे जिल्हाधिकारी होते. त्यांना येथील परिस्थितीची जाणीव आहे. ते सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

बऱ्याच काळानंतर आरोग्य विभागानं या समस्येकडे गांभिर्याने लक्ष घातलं असून जातिनिहाय आरोग्य सचिव यांचे पाय आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयास लागले. त्यामुळे येणाऱ्या काळात आरोग्य यंत्रणेच्या समस्या सुटून जिल्हा वासियांची बांबोळीवारी थांबण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले श्री‌. सिंह सकारात्मक कार्यवाही करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मिडीयाशी बोलणं टाळलं !
आढावा घेतल्यानंतर श्री. सिंह यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. मिडीयाशी बोलणं त्यांनी टाळलं.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles