सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय ॲथलॅटिक्स स्पर्धेचे आयोजन खेमराज मेमोरियल स्कूल बांदा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कु.प्रियाली नागडे हिने तृतीय क्रमांक पटकावला असून तसेच कु.मेलसी डिसोजा या विद्यार्थिनीने शंभर मीटर धावणे या प्रकारात द्वितीय क्रमांक तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटात कु.संगम धारगळकर या विद्यार्थ्याने 110 मीटर हर्डल्स या क्रीडा प्रकारात द्वितीय स्थान पटकावले आहे. यातील मेल्सी डिसोजा व संगम धारगळकर या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
तसेच 14 वर्षाखालील मुलांच्या गटात थाळीफेक व भालाफेक या क्रीडा प्रकारात कु. करण कासरलकर याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच कु.युवराज तळकटकर याने 80 मीटर हर्डल्स या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक तर कु.शुशोधन सावंत याने 600 मीटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक या खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी झालेली आहे तसेच याने 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय स्थान तर फ्रान्सिस तिरकी याने 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय स्थान तर शंभर मीटर रिले या क्रीडा प्रकारात मुलगे आणि मुलींच्या 14 वर्षाखालील वयोगटात दोन्ही समूहांनी तृतीय स्थान पटकावले आहे.
सदर विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक हितेश मालंडकर व श्रीम.शेरॉन अल्फांसो यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय फादर रिचर्ड सालदाना,पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.


