Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा विरोध! ; कोथरूडमधील शो बंद पाडला.

पुणे : मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ हा मराठी चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पुण्यातून विरोध होत आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्यामुळे नव्या मराठी चित्रपटावर वादंग निर्माण झाला आहे. हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला असून, हा हिंदूंच्या श्रद्धेचा ‘बाजार मांडण्यासारखा प्रकार’ असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुण्यात शो बंद पाडला –

पुण्यात आज मनाचे श्लोक या चित्रपटाचे शो हिंदुत्ववादी संघटनेकडून बंद पाडण्यात आले. पुण्यातील कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपट कार्यकर्त्यांनी चालू शो मध्ये गोंधळ घालत शो बंद पाडला. हा हिंदूंच्या श्रद्धेचा ‘बाजार मांडण्यासारखा प्रकार असल्याचे म्हणत चित्रपटाचे मनाचे श्लोक हे नाव बदलण्याची मागणीही हिंदुत्ववादी संघटनांनी केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी –

मनाचे श्लोक हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. मनाचे श्लोक या नावावर हिंदू जनजागृती समितीने (HJS) आक्षेप घेतला होता. धार्मिक ग्रंथाचे नाव केवळ व्यावसायिक लाभ आणि मनोरंजनासाठी वापरणे, हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे असल्याचे समितीने म्हटले होते. तसेच शो बंद पाडण्याची धमकीही दिली होती. या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र ही याचिका फेटाळल्याने चित्रपट आज प्रदर्शित झाला.

चित्रपटाच्या टीमने काय म्हटले?

न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना चित्रपटाच्या टीमने म्हटले होते की, आम्ही ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेहनत करत आहोत. ‘मना’चे श्लोकया नावाचा चित्रपट येत असल्याचे सर्वांनाच खूप आधीपासून माहीत होते. मात्र, प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याचा अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीपासून सोशल मीडियावर नावाबाबत विरोधाचे मेसेजेस फिरू लागले. या सगळ्या गोष्टींमुळे संपूर्ण टीमला अनावश्यक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. घटनांचा क्रम बघता हे सर्व पूर्वनियोजित असल्याची शंका येते आणि हे दुर्दैवी आहे. चित्रपटामध्ये रामदास स्वामींचा किंवा त्यांच्या कुठल्याही श्लोकाचा उल्लेख सुद्धा नाही. ‘मना’चे श्लोक हे शीर्षक चित्रपटातील नायक व नायिका म्हणजेच मनवा आणि श्लोक यांनी त्यांच्या मनांबरोबर सुरू केलेल्या प्रवासाशी संबंधित आहे. आम्ही सर्वजण रामदास स्वामींच्या सर्व रचनांचा सन्मान करतो आणि त्यांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. आम्ही या नावाशी प्रामाणिक आहोत असं टीमने म्हटले होते.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles