मुंबई : भारताचा स्टार खेळाडू शुभमन गिलचे देशभरात लाखो चाहते आहेत. तरुणी तर त्याची एक झलक पाहण्यासाठी अक्षरश: जीवाचं रान करतात. शुभमन गिलचं क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी नाव जोडले जाते. हे दोघेही रिलेशनशीपमध्ये आहेत, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे या दोघांचे एकत्र असतानाचे अनेक फोटो व्हायरल झालेले आहेत. असे असतानाच आता भारतातली प्रसिद्ध डान्सरने शुभमन गिलबाबत मोठं विधान केलं आहे. तिच्या या विधानाची देशभरात चर्चा होत आहे.
कोणती डान्सर शुभमन गिलच्या प्रेमात?
या प्रसिद्ध डान्सरचे नाव आहे सपना चौधरी. सपना चौधरीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे तिच्या एका कार्यक्रमाला हजारो तरुण उपस्थित असतात. तिने नुकतेच शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये उपस्थिती दर्शवली. या पॉडकास्टमध्ये तिने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली आहेत. तिला असाच एक प्रश्न शुभमन गिल आणि रोहित शर्माबद्दल विचारण्यात आला होता. तिने या प्रश्नाचे अगदीच भन्नाट उत्तर दिले आहे.
कोणासोबत स्टेज शेअर करायला आवडेल?
शुभांकर मिश्रा यांनी सपना चौधरीला एक खास प्रश्न विचारला. तुम्हाला क्रिकेटर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यापैकी एकासोबत स्टेज शेअर करण्याची वेळ आली तर तुम्ही कोणाची निवड कराल? असे शुभांकर यांनी सपना यांना विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने थेट शुभमन गिलचे नाव घेतले. मला शुभमन गिलसोबत स्टेज शेअर करायला आवडेल, असे तिने बिनदिक्कत सांगितले आहे. सपनाच्या या उत्तरानंतर शुभांकरने शुभमन गिल तर तुमच्या मुलासारखा आहे, असे विधान केले. त्यानंतर मग शुभमन नसेल तर मला रोहितसोबतही स्टेज शेअर कराया आवडेल, असेही पुढे सपना चौधरी म्हणाली.
नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स –
दरम्यान, तिचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. नेटकरी आता तिच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काही नेटकरी तर सारा तेंडुलकरचे नाव घेऊनही कमेंट्स करत आहेत.


