सावंतवाडी : गुरूवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचालित इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडेला नुकताच इंडियाज् ॲक्टिव्हिटीज् एक्सलन्स अवॉर्ड प्राप्त झाला आहे. रंगोत्सव सेलिब्रेशन तर्फे आयोजित विविध चित्रकला प्रकारांमध्ये प्रशालेतील जवळपास दिडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. याच उत्तुंग कामगिरीबद्दल प्रशालेला हा पुरस्कार प्राप्त झाला.
प्रशालेचे मुख्याध्यापक अजय बांदेकर यांच्या हस्ते प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली मनोज नाईक यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.
त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेसाठी निवड झालेल्या प्रशालेतील ५१ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, मेडल्स आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक अजय बांदेकर यांना प्राप्त दि लीडरशीप इन एज्युकेशन अवॉर्ड आणि कला शिक्षक प्रसन्न सोनुर्लेकर यांना प्राप्त रेने मॅग्रेटी अवॉर्ड या पुरस्कारांचे वितरण देखील यावेळी करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली मनोज नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, विभागप्रमुख आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
अभिमानास्पद! – तळवडेच्या इंग्लिश मिडीयम स्कूलला ‘इंडियाज् ॲक्टिव्हिटीज् एक्सलन्स अवॉर्ड’ ; तब्बल ५१ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेसाठी निवड!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


