Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत श्री जनता विद्यालय तळवडेचे घवघवीत यश!

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि तालुका समन्वय समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चालू शैक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले .
या स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धेत १४ वर्षा खालील मुलगे व मुली १) अभीर प्रसाद पेडणेकर ( लांब उडी ) – प्रथम क्रमांक
२)प्रेक्षा उदय दळवी (लांब उडी) – तृतीय क्रमांक, ३) सौम्या दत्ताराम मेस्त्री ६०० मीटर धावणे- द्वितीय क्रमांक ४) समृद्धी संतोष नाईक ४०० मीटर धावणे- द्वितीय क्रमांक ५)समृद्धी अर्जुन आचरेकर ४०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक, ६ )अभीर प्रसाद पेडणेकर १०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक .
१७ वर्षाखालील मुलगे व मुली १)पूजा तुकाराम सावंत- १०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक, २) धनश्री प्रभाकर कुंभार- तृतीय क्रमांक, ३) श्रावणी दळवी ४०० मीटर धावणे- द्वितीय क्रमांक ४) साक्षी पेडणेकर ८०० मीटर धावणे-द्वितीय क्रमांक, ५) आरुषी सावंत ३००० मीटर धावणे – द्वितीय क्रमांक, ६) कोमल नाईक १५०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक ७) गुरुनाथ रमाकांत मांजरेकर १५०० मीटर धावणे -तृतीय क्रमांक
सांघिक खेळ प्रकारात १४ वर्षे खालील मुली रिले ४×१०० मीटर- प्रथम क्रमांक, यामध्ये प्रीती पेडणेकर, लावण्या कुंभार, स्वरा जोशी, हर्षा लोके, या खेळाडूंचा सहभाग होता. मुले रिले ४×१०० मीटर- प्रथम क्रमांक,यामध्ये अभीर पेडणेकर,ज्ञानेश गावडे, निखिल सोनवणे, मंथन जाधव या खेळाडूंचा सहभाग होता .
१७ वर्षाखालील मुली रिले ४×१०० मीटर- द्वितीय क्रमांक, कबड्डी १७ वर्षे मुलगे – द्वितीय क्रमांक ,खो खो मुली- तृतीय क्रमांक. वरील पैकी सांघिक प्रथम क्रमांक व वैयक्तिक प्रथम व द्वितीय क्रमांकाची निवड जिल्हा स्तरासाठी झालेली आहे
प्रशालेने दरवर्षीप्रमाणे परंपरा राखत समाधानकारक यश मिळवल्याने शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे चे सर्व पदाधिकारी , शाळेचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई ,पर्यवेक्षक तथा ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दयानंद बांगर, क्रीडा शिक्षक विजय सोनवणे, प्रवीण गोडकर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles