सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि तालुका समन्वय समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चालू शैक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच बांदा येथे खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरस्कर जुनिअर कॉलेज बांदा येथे पार पडल्या.
या स्पर्धेत कु. आयुष उदय वालावलकर (१२ वी, वाणिज्य) याने गोळा व थाळी फेक प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
तसेच कु. सानिया उदय म्हसकर (१२ वी, वाणिज्य) हीने भाला फेक वे 200 मी. धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.

कु. लवू प्रशांत नाईक याने 200 मीटर मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला व भाला फेक मध्ये तृतीय कमांक प्राप्त केला.
तसेच कु. साक्षी देविदास रामाळे हिने थाली फेक मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला व गोळा फेक मध्ये द्वितिय क्रमांक प्राप्त केला.
शिवाय रिले या क्रीडाप्रकारात महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. यामध्ये कु. मंथन गावडे, कु. आर्यन जाधव, निल नाईक, साहील चव्हाण यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यांची ओरोस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था, संस्था पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका सौ. सुमेधा सावळ, श्री. सुनील परब, श्री. मोहन पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एन.जी. नाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


