- संजय पिळणकर. वेंगुर्ला : पालकमंत्री सिंधुदुर्ग तथा मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.श्रीपाद पाटील यांच्या मार्फत दी १० ऑक्टोबर रोजी मच्छीमार समाजासाठी मोफत महा आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मच्छीमार नेते वसंत तांडेल व वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर जयंत मोंडकर, तुषार साळगावकर, डॉ. शाम राणे आदि उपस्थित होते.
शिबिरासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत, स्त्रीरोग डॉ. स्वप्नाली माने, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सौरभ पाटील, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. शाम राणे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. दीपाली जाधव, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. समाधान निळकंठ नेत्रचिकित्स अधिकारी या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार केला. - दीपप्रज्वलनंतर उप जिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप सावंत यांनी शिबिरात देण्यात येणाऱ्या सेवांविषयी माहिती दिली,तसेच मच्छीमार समाजबांधवांनी कोणत्याही शारीरिक व मानसिक आजाराकडे दुर्लक्ष न करता,त्वरित निदान करून घेण्याचे महत्व सांगितले व आजार बळावण्यापूर्वी औषधोपचार करून घेण्याचा सल्ला दिला. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणी व्यतिरिक्त मानसिक आजारावर समुपदेशन, पोषण व आहाराविषयी सल्ला, व्यसनमुक्ती सल्ला,तसेच आरोग्य मित्र यांच्याकडून रुग्णाचे आभा कार्ड,आयुष्यमान कार्ड व वय वंदना कार्ड काढण्यात आले.
सदर आरोग्य शिबिराचा सुमारे २०० मच्छीमार समाजबांधवांनी लाभ घेतला व उत्सुर्फ प्रतिसाद दर्शवला. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी मच्छीमार नेते वसंत तांडेल, जयंत मोंडकर,वेंगुर्ला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र लिलाके, वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, सर्व वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयीन स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबेरकर व आभार श्री. सौदागर यांनी मानले.
वेंगुर्लेत मच्छीमार समाजबांधव महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


