सावंतवाडी : रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा प्रकारांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. त्यामुळे प्रशालेतील विद्यार्थ्यांची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या स्पर्धांसाठी करण्यात आलेली आहे. यात प्रामुख्याने इयत्ता चौथीमधील विद्यार्थिनी कु. तन्वी संजय परब हिने रंगभरण स्पर्धा स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली. इयत्ता आठवी मधील कु. ऋतुजा कुसुमाकर मातोंडकर या विद्यार्थिनीनी रेखाचित्र रेखाटन या स्पर्धा प्रकारामध्ये फाइव स्टार ब्रिलियंट अवॉर्ड पटकावत शाळेचे नाव उंच केले. इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी कु. कल्पना सुरेंद्र मोरजकर या विद्यार्थिनीने रंगभरण स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केले.


तसेच इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनी कु. संस्कृती कृष्णा पालयेकर हिने कोलाज बनवणे या स्पर्धा प्रकारामध्ये आर्ट मेरिट अवॉर्ड मिळवून शाळेच्या इतिहासात यशाचे सोनेरी पान जोडले. प्रशालेतील सर्वच विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धा प्रकारांमध्ये आपला सहभाग दर्शविला होता त्यापैकी एकूण 45 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. 23 विद्यार्थ्यांनी रौप्य पदकाची कमाई केली तर 16 विद्यार्थ्यांनी कांस्यपदकाची कमाई करून शाळेचे नाव सातासमुद्रापार नेले. तसेच काही विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके ही पटकावली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील मार्गदर्शक शिक्षक मनिष सावंत तसेच शिक्षिका सौ. प्रियांका शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणाली रेडकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन सर यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


