सावंतवाडी : आरोपी प्रवीण ईश्वर जाणवेकर (वय 50), संतोष दिनकर माने (वय 44, दोन्ही राहणार इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) हे अँबेसिडर कार नंबर MH 12 JA 4490 मधून गोवा बनावटीचे विविध ब्रँडची 2 Ltr, 750ml, 180 ml च्या एकूण सुमारे 250 बाटल्या दारू गोवा ते इचलकरंजी असे वाहतूक करत असताना मिळून आले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे पथक, उपनिरीक्षक सरदार पाटील, आंबोली दूरक्षेत्र अंमलदार हवालदार रामदास जाधव, गौरव परब यांनी दाणोली ट्राफिक चेक पॉइंटचे अंमलदार श्री. जमादार, आंबेरकर, हवालदार रुक्मानंद मुंडे यांच्या मदतीने आंबोली घाटाच्या पायथ्याशी नानापाणी याठिकाणी केली आहे.
गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना इचलकरंजी येथील दोघांना अटक! ; सावंतवाडी पोलिसांची धडक कारवाई सुरूच.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


