- सोशल मीडिया संयोजक केतन आजगावकर यांची माहिती.
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री विशाल परब यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर रोजी आहे. मागील अनेक वर्षे त्यांचा वाढदिवस त्यांचे हितचिंतक आणि मित्रपरिवाराकडून सावंतवाडीत धुमधडाक्यात साजरा केला जातो. अत्यंत कमी वयात जनमानसामध्ये आणि युवा वर्गामध्ये लोकप्रियता प्राप्त केलेले विशाल परब हे एक चुंबकीय व्यक्तिमत्व आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये पुनर्प्रवेश केल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या ध्येयधोरणावर चालत, विविध सेवाभावी उपक्रमांमधून भारतीय जनता पार्टी तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आजही ते जोमाने सुरु आहेत. भाजपाच्या सेवा पंधरावड्यात त्यांनी आरोग्य तपासणीची अद्ययावत व्हॅन आणून सर्वसामान्य लोकांना आधार दिला. आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या संकल्पनेवर काम करत भाजपाचे सर्व पदाधिकारी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आणि सावंतवाडीच्या प्रगतीसाठी काम करत आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना आहे की जनतेला पक्षाकडून काय अपेक्षा आहेत. प्रामुख्याने रोजगार आणि आरोग्य या इथल्या लोकांच्या प्रमुख समस्या आहेत. त्यामुळे भविष्यात युवकांना छोट्या मोठ्या उद्योगनिर्मितीसाठी साथ देत त्यातून उद्योजकता वाढवण्याचा आणि त्यातून इथल्या इथेच आपल्या गरजू भावाबहिणींना रोजगार मिळवून देण्याचे ध्येय बाळगून युवा नेते श्री विशाल परब काम करत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेशजी राणे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा कार्यकारिणीच्या मार्गदर्शनानुसार भाजपाचे काम ते आज सावंतवाडी मतदारसंघात जोमाने वाढवत आहेत. एक नियोजनबद्ध आराखडा भाजपा तयार करत आहे.
सावंतवाडीतील जनतेसमोरील आरोग्याचे प्रश्न, रोजगाराच्या संधीच्या अडचणी यासाठी काम उभे केले जाणार आहे अशा अनेक प्रश्नाच्या सोडवणुकीत कोणतेही राजकारण न आणता जनतेच्या सहयोगातून सावंतवाडीचा विकास एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे. १५ ऑक्टोबर रोजी होणारा युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस हा त्या दृष्टीने नव्या विकास पर्वाचा शुभारंभ ठरेल असा विश्वास भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या ध्येयधोरणावर चालताना यावर्षी त्यांनी आपला वाढदिवस कोणत्याही धुमधडाक्याच्या कार्यक्रमात नव्हे, तर विविध समाजोपयोगी उपक्रमांमधून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या भीषण परिस्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ते मदत करणार आहे. सावंतवाडीतील जनतेच्या आरोग्याच्या समस्येसाठी आरोग्यदूत म्हणून प्रभावी सेवाकार्य उभे करण्याचा संकल्प या वाढदिवसानिमित श्री विशाल परब यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रत्येक क्षेत्रात जागतिक स्तरावर अव्वल ठरत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य पुन्हा नव्याने उभारी घेत आहे. महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या या नव्या अध्यायाला जोडला जात आहे. “प्रत्येक घरी स्वदेशी घरोघरी स्वदेशी” हा भारतीय जनता पार्टीचा नारा ग्रामीण स्तरातील उद्योगांपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत सर्वांना नवी चेतना देत आहे जी भविष्यात समर्थ आणि सामर्थ्यवान असा नवा भारत घडणार असल्याचे संकेत देत आहे.
संपूर्ण कोकणमधून स्वदेशी ग्रामीण उद्योगांना, महिला बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारा मेक इन कोकण” हा उपक्रम विशाल परब यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या संकल्पनेतून सुरु केला जात आहे. विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री यावरच केवळ अवलंबून न राहता भविष्यात छोट्या छोट्या उद्योगांमधून महिलांना, युवकांना आत्मनिर्भर बनवण्याचा हा संकल्प असून भविष्यात मेक इन कोकण हे कोकणी उद्योजकांच्या एकमेकांच्या सहकार्याचे, परस्परांना मदतीसाठीचे एक व्यापक व्यासपीठ बनवण्याचा संकल्पदेखील विशाल परब यांनी जाहीर केला आहे. एका अर्थाने, या भव्य उपक्रमाचा शुभारंभ युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपा नेते खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार होत आहे.
कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कोकणच्या वाटचालीत सर्वसामान्य जनतेची मोलाची साथ असली पाहिजे हा भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे. या संकल्पामागे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रेरणा आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विकासासाठी सर्वसमावेशक काम उभे करा हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा नेहमीच सल्ला असतो आणि हाच सल्ला आदेश म्हणून स्वीकारताना यावर्षीचा वाढदिवस हा विविध सेवाभावी उपक्रमातून साजरा करण्याचा निर्णय विशाल परब यांनी घेत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांना सर्व उपक्रतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


