सावंतवाडी : एखादा कार्यकर्ता दुःखात असेल तर मात्र नेते मगं कोणताही पक्ष असो सहानुभूती देण्यासाठी हजेरी लावताच! मग एखाद्या चिरे खाणीत परप्रांतीयाकडून युवतीवर अत्याचार होतो तेव्हा ? न्याय हवा! न्याय सुरक्षा दल झोपलय का?. एरवी कोणत्याही दुर्घटनेच्या बाबतीत संबंधित राजकीय नेते तेथील पिढीत कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन करण्यासाठी चौवीस तासात हजेरी लावतात मग सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील चिरे खाणीत परप्रांतीयाकडून येथील मोल मजुरी करणाऱ्या युवतीवर अमानुष कृत्य घडलं त्याबाबतही या राजकीय वर्तुळात नेत्यांची पीडित कुटुंबाशी चर्चा करून या अशा गुन्हेगार प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि पीडित कुटुंबियांना न्याय सुरक्षा मिळवून देण्यासाठी पाठिंबा देणं हे जबाबदार राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांनी परम कर्तव्य नाही का?
आज ज्या खाणींच्या परिसरात हा अश्लील गुन्हा घडला तेथील अपराधी नराधम हे परप्रांतीय कामगार आहेत. आणि संबंधित व्यावसायिक हा स्थानिक आहे तसेच ही घटना जेव्हा घडली त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला तो पर्यंत संबंधित चिरे खाण मालक यांना कोणतीही कल्पना नव्हती का?
की यांनीच हा अनधिकृत विषय दडपण्याचा प्रयत्न तर केला नसेल ना?
नाही तर तरपरप्रांतीय मजूर याला गोवा येथेच गुप्त जागेवर लपण्याचा सल्ला कोणी दिला?
या सोबत इतर कोण व्यक्ती होते तसेच हे गुन्हेगार प्रवृत्तीचे कामगार यांची जातपडताळणी कागदपत्रांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात या पूर्वी करण्यात आली आहे का?
या बाबतही खातेनिहाय शासकीय चवकशी व्हावी तसेच संबंधित खाण मालक यांचे दूरध्वनी क्रमांक संभाषण व या नराधम आरोपी यांच्यामधील संवाद याबाबत योग्यता शासकीय संशोधन संस्थेच्या कार्य यंत्रणेमार्फत जाच पडताळणी करण्यात यावी तसेच या प्रकरणी खाण मालक व पीडित युवतीच्या अत्याचारातील दोषी नराधम याची नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून सदर पीडित युवती व त्याच्या कुटुंबीयांना योग्य तो न्याय सुरक्षा मिळवून देणं संबंधित पोलिस ठाण्यातील चवकशी विभागाला सोईस्कर होईल आणि ही अशी घटना भविष्यात पुन्हा घडू नये अशी कडक शासकीय संविधान कलमांच्या आधारे गुन्ह्यात दोषी,गुन्हेगार प्रवृत्तीस मदत करणे,गोरगरीब गरजू कुटुंबियांना न्यायापासून वंचित ठेवणे ,असे आणि या बाबत संविधानात तरतूद असलेले कायदे कलम लागू करून सबंधित पीडित व्यक्तीस व त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या उद्देशाने सर्वोतोपरी शासकीय कायद्यांच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन तर्फे प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून बोलताना व्यक्त केली आहे.
तसेच संबंधित प्रकरणात न्याय देण्यासाठी योग्य वेळेस आमरण उपोषणाच ही इशारा मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य तर्फे लेखी निवेदनामार्फत संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येणार असल्याचे श्री. अमित वेंगुर्लेकर यांनी सांगितले आहे.
एखाद्या चिरे खाणीत परप्रांतीयाकडून युवतीवर अत्याचार होतो तेव्हा? ; लढणार पण सोडणार नाय ! : अमित वेंगुर्लेकर यांचा स्पष्ट इशारा!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


