सावंतवाडी : आज दिनांक 13.10.2025 रोजी रात्री साडेनऊ वाजता आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे वाहने चेक करीत इनोव्हा गाडी क्रमांक MH 02 – BD 2917 ही सावंतवाडी कडून कोल्हापूरच्या दिशेने आली असता तिला थांबवताना पळून गेल्याने तिचा पाठलाग करून चौकुळ रस्त्याला सरकारी वाहनाने पाठलाग सुरू केला तसेच चौकुळ येथे स्थानिक लोकांना रस्ता ब्लॉक करण्यास सांगून सदरची गाडी थांबवून गाडीची तपासणी केली असता त्यात एकूण 1,02,000/- रुपये किमतीची गोवा बनावटीची विविध ब्रँड ची 20 Box दारु मिळून आली. इनोव्हा वाहन ५ लाख किमतीचे व दारू १ लाख २ हजार असा ६,०२,०००/– (सहा लाख दोन हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाहनचालक आरोपी सतीश भीमराव आर्दळकर (वय 37, रा. अडकूर, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) व अविनाश दशरथ पाटील (वय 32 वर्षे, रा. बोंदुर्डी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पंचनामा करून गुन्हा नोंद करून अटकेची कारवाई करीत सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे पथक हवालदार संतोष गलोले, रामदास जाधव, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे, गौरव परब यांनी केली आहे.
सावंतवाडी पोलिसांना सलाम! – थरारक पाठलाग करून शिताफीने अवैध दारू वाहतूक पकडली! ; चंदगड येथील दोघांना ६ लाखांच्या मुद्देमालासह अटक!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


