साप हा असा सर पटणारा प्राणी आहे,. सापाविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. सापाबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते. हा एक विषारी प्राणी असल्याने त्याला जवळजवळ प्रत्येकजण घाबरतो. पण प्रत्येक साप हा विषारी नसतो. सापाला पाय नसतात. त्यामुळेच तो सरपटत चालतो.
सापाचे डोळे आणि जीभ वगळता इतर कोणताही अवयव आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळेच सापाला हृदय असते का? सापाला हृदय असेल तर ते नेमके कुठे असते? असे विचारले जाते. याचेच उत्तर जाणून घ्या –

सापाला हृदय असते. ते त्याच्या शरीरातच सुरक्षित राहील अशा ठिकाणी असते. कोणीही हल्ला केला तर हृदयाला काहीही होऊ नये यासाठी सापाचे हृदय हे पेरिकार्डियम नावाच्या एका प्रकारच्या पिशवीमध्ये सुरक्षित असते.
सापाला फुफ्फुस नसते. त्यामुळेच साप जशी हालचाल करतो, तसे-तसे सापाचे हृदयदेखील त्याच्या जागेवरून थोडेसे हालत राहते.
(वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सखोल माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा)


