मालवण : क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित ओरोस येथे संपन्न झालेल्या 19 वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय हातोडा फेक या क्रीडा प्रकारात स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील कु. निशांत नितीन शिरोडकर याने द्वितीय क्रमांक पटकावला असून विभाग स्तरासाठी त्याची निवड झाली आहे.
निशांतच्या या उत्तुंग यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ. सी. देसाई, शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


