सावंतवाडी : तालुक्यातील कारिवडे भैरववाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी ‘शिंदे’ गटात सामील करण्यात संजू परब यांना प्रचंड यश आले आहे. आज सावंतवाडी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
यात रोहन चंद्रकांत साईल, प्रथमेश संजय साईल, प्रणव सुमंत साईल, प्रसाद किरण साईल, मधुकर सीमा साईल, सुजल विश्राम साईल, तेजस संजय साईल, बाळू देवेंद्र साईल, संदीप लहू साईल, खेमा बाबाजी साईल, भिवा शंकर साईल, विश्राम साईल, एकनाथ साईल, विकास साईल, सुमंत साईल, भगवान साईल, चंद्रकांत साईल, दत्ताराम साईल, महादेव साईल, बाबना साईल, नितीन गावडे, शिवराम साईल, रवी परब, शशिकांत सावंत, सुखाजी साईल, रवींद्र साईल, योगेश साईल, संजय साईल, हरिश्चंद्र साईल, संदीप दत्ताराम साईल, अरविंद परब तसेच सदर पक्ष प्रवेश युवा शाखाप्रमुख कारिवडे अरविंद परब, केतन गावडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
दरम्यान यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, तालुकाध्यक्ष व युवा नेते दिनेश गावडे, सावंतवाडी विधानसभा युवासेना अध्यक्ष अर्चित पोकळे, विनोद सावंत, रवी परब, जिल्हा परिषद कोलगाव उपविभाग प्रमुख नितीन गावडे, कोलगाव शाखाप्रमुख गौरव कुडाळकर, कोलगाव जिल्हा परिषद विभागप्रमुख महेश सावंत यांसह शिंदे शिवसेनेचे तमाम पदाधिकारी व शिलेदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


