बांदा : सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या बांदा येथील नट वाचनालयात माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी आणि वाचनालय सदस्यांनी “वाचनाचे महत्त्व” यावर विचार मांडले. वाचनाची सवय ही केवळ ज्ञानवृद्धी नव्हे, तर चारित्र्य विकास आणि विचारांची दिशा देणारी असते, असे प्रतिपादन अनंत भाटे यांनी यावेळी केले.
या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष, सचिव, ग्रामस्थ तसेच विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. वाचनालयातील पुस्तकांचे प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आले असून अनेकांनी त्याचा लाभ घेतला.
या उपक्रमातून ग्रामीण भागात वाचनसंस्कृती अधिक बळकट करण्याचा आणि डॉ. कलाम यांच्या “स्वप्न पाहा आणि ते साकार करा” या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन केले तसेच कविता सादर केल्यात.
यावेळी अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोस्कर, अनंत भाटे, महिला संचालिका स्वप्नीता सावंत, सालू परेरा, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, कर्मचारी सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी करून आभार मानले.
यावेळी अध्यक्ष श्री. सावंत यांना 90 व्या वाढदिनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.


