सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्यतर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या कु. करण कासरलकर याने घवघवीत यश संपादन केले आहे.
त्याने 14 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात गोळाफेकमध्ये प्रथम स्थान व थाळीफेकमध्ये द्वितीय स्थान पटकावले आहे.
या विद्यार्थ्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सदर विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री हितेश मालंडकर व श्रीम.शेरॉन अल्फांसो यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय फादर रिचर्ड सालदाना,पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
मिलाग्रीस हायस्कूलच्या करण कासरलकरचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दुहेरी यश. ; गोळाफेकमध्ये अव्वल तर थाळीफेकमध्ये पटकावले द्वितीय स्थान.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


