बिजनौर : दीर आणि वहिनी हे पवित्र नातं आहे. पण अलीकडे या नात्यात मर्यादा ओलांडण्याच प्रमाण वाढलं आहे. असच एक प्रकरण समोर आलं आहे. दीर आणि वहिनीमध्ये अफेअर सुरु होतं. दोघांच्या प्रेम प्रकरणाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी टोकाचं पाऊल उचललं. संशयास्पद परिस्थितीत दोघांनी विष प्राशन केलं. दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील हे धक्कादायक प्रकरण आहे.
किरतपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील हुसैनपुर गावचं हे प्रकरण आहे. सोमवारी ललित (19) आणि नात्यात वहिनी लागणार्या आरती (35) यांनी संशयास्पद परिस्थितीत विष प्राशन केलं. दोघे गावाजवळच्या जंगलात बेशुद्ध अवस्थेत सापडले. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
पती सोबत रहायला तयार झाली व घरी परत आली –
आरतीला दोन मुलं आहेत. एक नऊ वर्षाची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा. दोघे आईच्या आठवणीने व्याकुळ झाले आहेत. गावात चर्चा आहे की, आरती आणि ललितमध्ये मागच्या काही महिन्यापासून प्रेम प्रकरण सुरु होतं. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोंबर रोजी प्रेमी युगल घरातून फरार झालं. नातेवाईकाच्या अर्जावरुन पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आणि दोघांना शोधून काढलं. त्यावेळी आरती नातेवाईकांच्या समजावण्यावरुन पती सोबत रहायला तयार झाली व घरी परत आली.
दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले –
पण नंतर ललित आणि आरतीने दिवाळीच्या दिवशी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. दोघे जंगलात सापडल्याच समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी दोघांना रुग्णालयात पाठवलं असं किरतपुर प्रभारी निरीक्षक पुष्पा देवी यांनी सांगितलं. डॉक्टरांनी दोघांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन हायर सेंटरला रेफर केलं. पण रस्त्यातच दोघांचा मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे. त्यातून दोघांनी कोणता विषारी पदार्थ खाल्ला त्याची माहिती मिळू शकते.
गावावर शोककळा पसरली –
या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे. मुलाच्या मृत्यूमुळे ललितच्या कुटुंबियांची रडून-रडून वाईट अवस्था झाली आहे. आरतीचं माहेर आणि सासरी दोन्ही ठिकाणी अशीच स्थिती आहे. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे असं ग्रामस्थांनी सांगितलं. पण सामाजिक बंधन आणि कुटुंबाच्या दबावामुळे एकत्र राहू शकले नाहीत.


