दोडामार्ग : गेली अनेक वर्ष सामाजिक, राजकीय, क्रीडा व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अग्रक्रमाने काम करणारे भेडशीतील युवा उद्योजक दत्ताराम (बाबा) टोपले गेली अनेक वर्षे भव्यदिव्य नरकासुर स्पर्धा आयोजित करत असतात. याही वर्षी त्यांनी अनोख्या पध्दतीने हा उत्सव साजरा केला. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक कालिदास भणगे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रगतिशील शेतकरी तथा देवस्थानचे ज्येष्ठ नागरिक अनिल मोरजकर यांचा श्री नंदकिशोर टोपले व बाबा टोपले यांच्या हस्ते करण्यात आला.

स्पर्धेदरम्यान उपस्थित भेडशी व्यापारी तसेच मित्रमंडळींचे स्वागत करण्यात आले. श्री बाबा टोपले यांचे स्पर्धा आयोजित करण्या मागता हेतू म्हणजे युवकांना व्यासपीठ देण्याचा असतो. या उपक्रमाचे सर्व स्तरातून बाबा टोपले यांचे कौतुक करण्यात येत आहे. या वेळी ग्रामविकास कमिटी भेडशीचे अध्यक्ष तुकाराम गंगाधर टोपले यांची कन्या कु. धनश्री तुकाराम टोपले ज्यांनी वकीली पदवी प्राप्त केल्या बद्दल सौ. गौरी दत्ताराम टोपले, सौ. सुजाता नंदकिशोर टोपले, सौ. सुशांती रोहीत टोपले यांच्या हस्ते धनश्रीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक चंदन गांवकर, राकेश भोळे यांनी विशेष उपस्थिति दर्शविली. या स्पर्धेसाठी अभिजीत म्हापसेकर, नागेश टोपले यांनी विशेष सहकार्य केले.


