Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

त्याची बायकोच त्याच्या संघटनेत!, बच्चू कडू यांनी फोडला राजकीय बॉम्ब! ; रवी राणांवर जहरी टीका.

अमरावती : दिवाळीतच अमरावतीत आरोपांची आणि टीकेची लड लागली. फराळावर ताव मारता मारता अनेक नेते राजकीय फुलबाज्या लावतात. पण बच्चू कडू यांनी जाहीर सभेतून रवी राणा आणि नववीत राणा यांच्यावर राजकीय आतषबाजी केली. आरोपांची राळ उडवून दिली. त्यांनी सत्ताधारी पक्षावर पण मोठा आरोप केला. तर राणा पती-पत्नीवर राजकीय आरोपांचा धुराळा उडवून दिला.

राणा दाम्पत्यावर टीका करताना बायको भाजपामध्ये आणि नवरा युवा स्वाभिमान पक्षात असल्याचा टोला बच्चू कडू यांनी लगावला. तुम्हीच गटार गंगेत उभे आहेत आणि तुम्ही राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत आहात. भाजप बायकोमध्ये आणि नवरा युवा स्वाभिमान मध्ये हे कशासाठी याचा स्पष्टीकरण आधी तुम्ही द्या. याला कसला स्वाभिमान म्हणायचं ना मान ना कसला स्वाभिमान. राणा एवढं नौटंकी जोडपं तर देशात पाहायला मिळणार नाही. असं कुठे आहे का भाजप नाव बायको भाजपात आणि नवरा स्वाभिमान संघटनेत. याची बायको याच्या संघटनेत राहू शकत नाही या एवढी नाचक्की यांच्यावर येत असेल तर अधिक काय बोलावे असा टोला कडू यांनी लगावला.

दिवाळीत माझी आठवण काढावी लागते

दिवाळीच्या दिवशी देखील राणांना बच्चू कडूंची आठवण येते म्हणजे किती झालं .राहले देवधर्म प्रभू रामचंद्र सोडून दिले आणि माझी आठवण करतात. किती जिव्हाळा आहे किती प्रेम आहे दिसून पडलं, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. मी विधान परिषद साठी करतो अस म्हणतात पण हे धंदे तुमचे आहे. सगळ्या पक्षाचे पाठिंबा घेऊन तुम्ही निवडणुका लढता कधी मशिदीमध्ये जाता कधी मंदिरात जाता कधी नमाज पडायचा तर कधी प्रभू रामचंद्र च नाव घेऊन राजकारण करायचं हा तुमचा धंदा झाला आहे.

तुम्ही माझ्या औकातीत येऊ शकत नाही, मी मरेपर्यंत सांगतो बच्चू कडू हा मरेपर्यंत आणि मेल्यावर कोणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. कुण्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही. जे काही लढू ते स्वतःच्या ताकदीवर. ते तुमची लायकी आहे. तुम्ही लायसाठी धंदे करता तुम्हाला वरून कार्यक्रमाला आहे. वरून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम दिला आणि तुम्ही बोलायला लागले दोघेजण, असा आरोप कडू यांनी केला.

ज्यांनी भाजपला शिव्या दिल्या मोदींना शिव्या दिल्या त्या आता भाजपच्या नेत्या झाल्या. हा कार्यक्रम देवेंद्र फडणीस यांनी दिला आहे देवेंद्र फडणवीस राणांना बोलायला लावतात की बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आंदोलन करता येते थांबलं पाहिजे. हे राणा दाम्पत्य शेतकरी विरोधात आहे. शेतमजुराविरोधात आहे. एक एक थैली किराणा दिला म्हणजे दिव्यांगाचा समस्या संपल्या का तो आयुष्य कसा काढतो तो कसा जगतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकदा पूर्ण हिशोब करावाच लागेल आंदोलन झाल्यावर पाहू असा इशाराच त्यांनी राणा दाम्पत्याला दिला.

त्या माय माऊलीला माहित नाही की मी विधानसभेत कितीदा बोललो त्यांना माझ्या भाषणाची कॅसेट पाठवावी लागेल, अशी टीका त्यांनी नवनीत राणा यांच्यावर केली. मी आमदार मंत्री असताना दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलो होतो. राणांची मजबुरी आहे, त्यांना बोलावं लागतं त्यांना वरून कार्यक्रमाला आहे. त्यांना लाचारी करावीच लागते असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles