बांदा : येथील ‘आमची वाडी देऊळवाडी’ मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नरकासुर स्पर्धेला भाजपचे युवा नेते तथा यशस्वी युवा उदोजक विशाल परब यांनी भेट दिली. या भेटीप्रसंगी मंडळातर्फे नीलेश मोरजकर यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्नेहपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना विशाल परब म्हणाले की, “आमची वाडी देऊळवाडी मंडळाने गेली सलग सात वर्षे ही स्पर्धा बांदा शहरात अत्यंत उत्साहात आयोजित केली आहे. मंडळाचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेऊन या स्पर्धेचे आयोजन यशस्वीरीत्या करतात, ही कौतुकास्पद बाब आहे. या स्पर्धेत गोवा राज्यातील विविध मंडळांचाही सहभाग असतो. या मंडळांकडून साकारल्या जाणाऱ्या नरकासुर प्रतिमा भव्य आणि आकर्षक स्वरूपात असतात. रसिक प्रेक्षकांना स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेता यावा, यासाठी ही स्पर्धा पुढीलवर्षी खुल्या जागेत घेण्यात यावी, अशी माझी अपेक्षा आहे. या उपक्रमासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य मी मंडळाला देईन,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांनी उपस्थित सर्व बांदावासीयांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.
याप्रसंगी बांदा उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर, पत्रकार निलेश मोरजकर, गुरू कल्याणकर, गुरुनाथ साळगावकर, आशिष सावंत, आकाश सावंत, देवेश वारंग, सुनिल माजगावकर, गौरव साळगावकर, गोकुळदास साळगावकर, सावळाराम शिरोडकर, राकेश परब, रोहन सुपल, मयुर परब, ऋषिकेश सावंत, महादेव शेगडे, भाग्येश धुरी, सर्वेश मुळ्ये, आशु माजगावकर, प्रसाद गवंडी, प्रशांत सावंत, भास्कर सावंत या मान्यवरांसह भरत माजगावकर, रुपेश माजगावकर, सिद्धेश कोरगावकर, तनय आरोलकर, हर्षद कामत, सिद्धेश शेवडे, संकेत माजगावकर, निखिल साळगावकर, प्रथमेश साटेलकर, अक्षय मयेकर व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश परब यांनी केले.


