Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कोसळणाऱ्या पावसातही तुफान रंगला अभंग रिपोस्ट! ; भाजपा युवा नेते विशाल परबांच्या हाकेला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!, अभंगवाणीतून गायकांनी जिंकली दर्दी रसिकांची मने!

  • ✍️ रुपेश पाटील.
  • सावंतवाडी : बाहेर सुरू असलेल्या पावसाच्या संततधारा आणि हृदयातून मनोभावे आलेली अभंगवाणी, यात आज तमाम सावंतवाडीकर रसिक न्हावून निघाले. याचे कारण म्हणजे भारतीय जनता पार्टी आयोजित तसेच युवा नेते विशाल परब यांच्या अभिनव संकल्पनेतून सजलेला ‘अभंग रिपोस्ट’ हा संगीतमय भाव गीतांचा कार्यक्रम. अर्थातच आज दुपारनंतर सावंतवाडी शहरात पावसानं थैमान माजवलं होतं. यातच विशाल परब यांचा कार्यक्रम म्हटला की नेहमीसारखेच ‘विशाल’ आयोजन, हे नेहमीच जणू समीकरणचं आहे.
  • सतत पाऊस सुरू असतानाही कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली. मात्र धो-धो कोसळणाऱ्या पावसात अभंगवाणी नक्कीच अनुभवास मिळेल की नाही? या विवंचनेत असलेल्या तमाम सावंतवाडीकर रसिकांना भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब आणि त्यांच्या रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या टीमने अजिबात नाराज केले नाही.  अत्यंत काटेकोरपणे असलेले नियोजन सोबतच कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या तमाम रसिकांसह मान्यवरांचे यथोचित स्वागत व सन्मान युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून अनुभवास मिळाला.
  • खरंतर महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात पोहोचलेले सहा युवा कलावंत ज्यांनी एका थीमवर काम केले ती म्हणजे अभंग रिपोस्ट अर्थातच अभंगवाणी आणि तीच अभंगवाणी धो-धो कोसळणाऱ्या पावसातही अनुभवास मिळाली ती सावंतवाडीकरांना. या बहारदार कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ‘परबांचा लेक’ नियती ज्याची ‘नेक’,  कार्यक्रम करतो एकापेक्षा एक तोही सुंदर आणि सुरेख” असे या कार्यक्रमाची अनुभूती घेतलेल्या प्रत्येकाच्या ओठांवर कार्यक्रम संपवून घरी जाताना आपसूकच शब्द उमटले असतील. अर्थातच यामागे प्रचंड मेहनत घेतली आहे ती भारतीय जनता पार्टीने आणि त्यांच्यासह युवा नेते विशाल परब यांच्या युवा टीमने.
  •         

दिग्गजांच्या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन –

दरम्यान कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर परब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोज नाईक, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक यांसह महिला आघाडीच्या प्रमुख श्वेता कोरगावकर,माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, तसेच युवा नेते विशाल परब यांच्या सौभाग्यवती वेदिका परब यांसह केतन आजगावकर, अमेय पै, ॲड. अनिल निरवडेकर, अमित परब, तसेच तमाम भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी केले तर उपस्थित जनतेला मार्गदर्शन करताना युवा नेते विशाल परब यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोसळणाऱ्या पावसातही उपस्थिती दर्शविणाऱ्या तमाम सावंतवाडीकर रसिकांचे मनापासून आभार मानत “आपली उपस्थिती हीच माझी ऊर्जा, यापेक्षा वेगळा आनंद काय असू शकतो?” असे आभार मानत “यापुढेही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी जे जे हवे ते सर्वकाही करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत” असे स्पष्ट केले.

दरम्यान भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनीही युवा नेते विशाल परब यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत सावंतवाडीची सांस्कृतिक जडणघडण आणि संस्कार यांबद्दल आपले मनोगत विचार मांडले.

कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुंदर आणि नीटनेटके झाल्याबद्दल राबणाऱ्या हातांना आणि ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या प्रत्येकाला युवा नेते विशाल परब व त्यांच्या सौभाग्यवती सौ. वेदिका परब यांच्या हस्ते यथोचित सन्मानकरण्यात आला.

‘अभंग रिपोस्ट’ टीमचाही ‘स्पेशल’ सन्मान! 

दरम्यान जगभरातील कानाकोपऱ्यात महाराष्ट्राची संतवाणी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या ‘अभंग रिपोस्ट’ टीमच्या सहाही शिलेदारांचा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब वं सौ. वेदिका परब, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावंतवाडीच्या सांस्कृतिक परंपरेचा साज असलेला लाकडी खेळण्यांच्या फळांची भेटवस्तू देऊन त्यांना आयुष्यभर सावंतवाडीची आठवण राहील, अशा पद्धतीने सन्मान करण्यात आला.

‘रिलोत्सव – २०२५’ स्पर्धेचे बक्षीस वितरण –

यावेळी “कोकण कोकण” या लोकप्रिय गिताचे सुप्रसिध्द गायक प्रणय शेट्ये यांच्या उपस्थितीत “रिलोत्सव – २०२५” स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यात स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळविणारे अनुक्रमे आकाश साळगावकर, दर्शन भट व रोशन सावंत यांना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे रोख रक्कम रुपये 25,000/-, 15,000/,
वं 10,000/ तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles