सावंतवाडी : सावंतवाडी शहराने आपली स्वतःची सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे. यात चार चाँद लावले ते विशाल परब यांच्या विविध उपक्रमांनी. विशाल परब म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण करणारं युवकांच्या आवडीचे नेतृत्व आहे. आगामी काळात विशाल परब यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यातून सावंतवाडीच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जे जे विधायक कार्य आहे, ते नक्कीच करू, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. सावंतवाडी शहरात विशाल परब यांच्या माध्यमातून संपन्न झालेल्या ‘अभंग रिपोस्ट’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, विशाल परब, सौ. वेदिका परब, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सावंतवाडी महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोज नाईक, ॲड. परिमल नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, केतन आडगावकर, ॲड. अनिल निरवडेकर, अमित परब यांसह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.




