सातारा : सातारा येथील महिला डॉक्टर यांच्या आत्महत्येनंतर अनेक मोठ-मोठे खुलासे होत आहेत. आता महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोयाकडून दखल घेण्यात आली असून वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांनी याप्रकरणी धक्कादायक खुलासे केले आहेत. दोन्ही आरोपींबद्दल त्यांनी मोठं सत्य सांगितलं आहे. शिवाय डॉक्टर महिला आणि पोलिसांनी एकमेकांविरोधात यापूर्वी तक्रार दाखल केल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर पुढील तपास सुरु आहे. असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.
डॉक्टर महिलेने आत्महत्या केली आहे. हातावर सुसाईड नोट लिहून डॉक्टरने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे.. नोटमध्ये PSI गोपाळ बदने यांनी लैंगिक अत्याचार आणि प्रशांत बनकर यांनी मानसिक त्रास दिल्याचं नमूद केलं आहे. राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली असून यामध्ये दोन्हीही आरोपी फरार असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांच्या तपासासाठी पोलीस पथक कार्यरत आहे. तीन महिने गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरकडून लैंगिक छळ आणि मानसिक त्रास दिल्याची तक्रार डॉक्टर महिलेने दाखल केली आहे का आणि केली असेल तर, मदत का मिळाली नाही?, याची देखील चौकशी व्हावी, असं देखील राज्य महिला आयोगाने सातारा पोलिसांना सूचना दिल्या आहेत.
संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये डॉक्टर महिलेचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. यामध्ये आरोपीची गय केली जाणार नाही. अशा घटना समाजात घडू नये यासाठी पोलीस कार्यरत असतात. पण रक्षकच कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर, ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे, असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांनी केलं आहे.
आरोपींचा तपास कुठे आहे सुरु?
रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड आणि पुणे याठिकाणी फरार असलेल्या अरोपींचा शोध सुरु आहे. डॉक्टर महिले पोलिसांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि पोलिसांनी देखील डॉक्टर महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती. दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार का दाखल केली? सविस्तर माहिती दिवसभरात येईल… असं देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या.
एवढंच नाही तर, गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्याबद्दल देखील त्यांनी मोठी माहिती दिली. दोन आरोपींमधील गोपाळ बदने हा पोलीस निरिक्षक आहे. तर प्रशांत हा इंजिनियर असून दोघांची पूर्वीपासून ओळख आहे आणि त्याची पोलिसांशी संबंध नाही. प्रशांत हा महिला डॉक्टरांच्या ओळखीची व्यक्ती आहे… दोघे देखील एकाच तालुक्यातील असल्याची देखील माहिती मिळत आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयातून मिळाली असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.


