Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच पुरावे… ; डॉक्टर महिला प्रकरणात कुटुंबीयांचा सर्वांत खळबळजनक दावा.

सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा येथील फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यामुळे डॉक्टरची हत्या झाली की तिने खरच आत्महत्या केली असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक खुलासा केला आहे.

SIT स्थापन करा अन्यथा आम्ही फलटणकडे जाणार. बीडच्या फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणी महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केली. पुढे ते म्हणाले की, आमच्याकडे कोणताही पुरावा नाही तिची बॉडी हॉटेलमध्ये आढळली. SIT स्थापन करून निवृत्त न्यायमूर्ती अध्यक्ष असावेत. हे प्रकरण बीड न्यायालयात चालवावे. बनकर कुटुंबाने चारित्र्यावर आरोप केले. स्वतःच्या बचावासाठी तिच्यावर आरोप करण्यात आला आहेत. मोबाईल देखील आम्हाला अद्याप देण्यात आला नाही.

नेमकं काय घडलं?

आमच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा होता आणि त्या दौऱ्याआधी आरोपी सरेंडर झाला. पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाला असा आमचा आरोप आहे. एका मुकादमाने जी माहिती दिली त्यामुळे कदाचित तेच खासदार यामध्ये असतील. आम्ही राज्य व्यापी आंदोलन करणार आहोत असा इशारा महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तरुणीने हातावर एक नोट लिहित स्वत:ला संपवले. पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक आणि लैंगिक छळाचा आरोप नोटमध्ये करण्यात आला. डॉक्टर तरुणीने आरोपी पीएसआयने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचेही स्पष्ट नोटमध्ये म्हटले. दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (भरतीय न्याय संहिता) कलम ६४ (बलात्कार) आणि १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. आता महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी खळबजनक दावा केला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles