मुंबई : कुडाळ – मालवण मतदार संघाचे दमदार आमदार निलेश राणे आणि गोर – गरीब जनता यांचे एकदम घट्ट नाते आहे. कोकणात तर निलेश साहेबांना गरिबांचा वाली म्हणूनच संभोधले जाते. कुडाळ येथील परंतु मुंबईला नोकरीस असलेल्या एका रामचंद्र सत्यवान सावंत, राहणार विरार, या तरुणाला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने मीरारोड येथील एक पंच तारांकित हॉस्पिटल मध्ये भरती केले. पेशंटच्या नातेवाईकांना इतका भास पण झाला नसेल की त्याचे पुढच्या 8 दिवसात बिल तब्बल 11 लाख रुपये झाले. कुडाळ मधून ही गोष्ट एका व्यक्तीने निलेश राणे साहेबांच्या कानावर घातली असता साहेबांनी स्वतः त्या विषयामध्ये पाठपुरावा घेतला आणि त्यांच्या राणे प्रतिष्ठान मेडिकल संघटनेच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या प्रशासनाशी बोलणे करून त्या पेशंट चे तब्बल 8 लाख माफ करून दिले. त्या पेशंटच्या नातेवाईकांनी तर निलेश राणे यांचे जाहीर आभार मानले.
ज्या कुडाळ – मालवण च्या लोकांनी निलेश राणे यांना आमदार बनवले त्या लोकांची सेवा करण्यासाठी आमदार निलेश राणे साहेब 24 × 7 उपलब्ध असतात, ही फार मोठी गोष्ट आहे.


