सावंतवाडी : मुंबई – गोवा हायवे वरील मळगाव व्यत्ये येथील चॉकलेट फॅक्टरीसमोर आज दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकी चालकाला रिक्षातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबतची अधिक माहिती व्येत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी दिली आहे.
दरम्यान मुंबई – गोवा हायवेवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतानाही ॲम्बुलन्सची सोय नसल्यामुळे अनेक वेळा अडचणी येतात. त्यामुळे येथे तात्काळ ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी गुणाजी गावडे यांनी केली आहे. संबंधित दुचाकी चालक जखमी असल्यामुळे त्याबाबत सविस्तर माहिती समजू शकली नाही.


