नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगाची समीकरणे बदलली आहेत. त्यामध्येच अमेरिका आणि पाक यांच्यातील जवळीकता वाढल्याचेही बघायला मिळतंय. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या प्रशासनाने तुर्कीमधून आणखी ड्रोन आयात केली आहेत. यापूर्वीच मालदीवचे आणि भारताचे संबंध ताणलेले असताना पुन्हा एकदा मोहम्मद मुइझ्झू यांनी भारताविरोधात मोठे पाऊल उचलल्याचे बघायला मिळतंय. समुद्रावर करडी नजर ठेवण्यासाठी भारताकडून घेतलेल्या डॉर्नियर विमानांच्या जागी तुर्कीचे ड्रोन मालदीवला हवी होती. मोठा करार मालदीवने केला असून यामध्ये फक्त मालदीवच नाही तर चीन आणि पाकिस्तानही सहभागी आहे.
मालदीवचा तुर्कीसोबतचा नवीन ड्रोन करार यामुळे भारताच्या त्याच्या शेजारच्या क्षेत्राबद्दलच्या चिंता वाढू शकतात आणि हा धोका आहे. भारत सुरूवातीपासूनच याला जोरदार विरोध करताना दिसतंय. मात्र, मालदीवने भारताच्या विरोधात जात असून ड्रोनची खरेदी केलीये. मालदीवच्या अधाधु दैनिकाने याबद्दल वृत्त दिले असून त्यांनी म्हटले की, तुर्कीहून तीन बायरक्तार टीबी 2 ड्रोन नुकताच मालदीवमध्ये दाखल झाले.
या ड्रोन खरेदीबद्दलची आणि कोणत्या मार्गाने मालदीवमध्ये हे ड्रोन दाखल झाले याबद्दलची सविस्तर बातमी अधाधु दैनिकाने दिलीये. मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल आता एक ड्रोन तळ स्थापन करत आहे. दुसऱ्या महायुद्धापासून गान हे ऐतिहासिकदृष्ट्या इंग्लंडच्या रॉयल एअर फोर्सचे तळ आहे. मात्र, मालदीव स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिशांनी ते सोडले. हेच नाही तर भारताच्या दबावामुळे अधाधूने असाही दावा केला आहे की, एमएनडीएफच्या अधिकाऱ्यांनी ड्रोनची देण्याबाबत स्पष्टपणे नकार दिला. सध्या या ड्रोनची चाचणी सुरू असल्याचीही माहिती मिळतंय. मोहम्मद मुइझ्झू सरकारचा खोटेपणा जगापुढे येताना दिसतोय. ड्रोन खरेदीची किंमत जाहिर करणे त्यांनी टाळलंय. अधाधू यांनी अंदाजे किंमत $37 दशलक्ष असल्याचा अंदाज लावला आहे.मालदीवची अर्थव्यवस्था जवळजवळ कोसळण्याच्या मार्गावर असताना हा करार केलाय.
मालदीवला हाताला धरून भारताविरोधात मोठा गेम करण्याच्या तयारीत पाकिस्तान आणि चीन असल्याचे बघायला मिळतंय. मागील काही वर्षांपासून भारत आणि मालदीवचे संबंध तणावात आहेत. पाकिस्तान आणि चीन हे संबंध अधिक बिघडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारताला त्याच्या शेजारी देशांवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. भारताला लागून असलेल्या पश्चिम हिंद महासागर क्षेत्रात पाकिस्तान, चीन आणि तुर्कीजी नवीन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही भारतासाठी अत्यंत जास्त चिंतेची बाब नक्कीच आहे.


