Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

जनसेवेचा घेऊनी ध्यास, युवाईचा सर्वांगीण विकास हाच ज्यांचा श्वास! – भाजपा युवा नेते विशाल परब नक्कीच आहेत खास! – ‘सत्यार्थ’ विशेष संपादकीय.

  • रूपेश पाटील
  • ”अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च।
    निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी॥
    संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः।
    मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः॥”
    — श्रीमद्भगवद्गीता १२.१३–१४

आपला महान ग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेच्या वरील ओळींचा अर्थ असा की, ”अशी व्यक्ती जी कधीच कुणाचाही द्वेष करत नाही. ज्याच्या मनात सर्वांप्रती मित्रता आणि करुणा भरलेली आहे. जो व्यक्ती सदैव ‘तुझं- माझं’ या भावनेपासून मुक्त आहे. अहंकाररहित आहे. आपल्या सुख – दुःखात जो सारखाच वागतो. जो क्षमाशील, संतुष्ट, संयमी आणि दृढनिश्चयी आहे. जो भगवंताचा निस्सीम भक्त आहे आणि आपल्या भक्तीभावाने इतरांनाही आनंद देत असतो, अशीच व्यक्ती भगवंताला प्रिय असते अर्थात आवडती असते”. या श्रीमद्भगवतीच्या शिकवणीप्रमाणे वागणारे फार दुर्मिळ असतात. त्यातील एक झंझावाती आणि ध्येयवेडं नाव म्हणजे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल प्रभाकर परब!

  

मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत होत असतानाही तीस हजारांपेक्षा जास्त मतदान ज्या मतदार राजाने आपल्याला बहाल केलं, त्यांच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी पुन्हा एकदा मनात सेवाभाव अन् दृढनिश्चय घेऊन मैदानात उतरलाय, विशेषत: युवाईचे आवडते आयडॉल विशाल प्रभाकर परब.

आज विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या भव्य दिव्य अशा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होत आहे. यावेळी हजारोंच्या साक्षीने हा विलोभनीय लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. विशाल परब हे असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्याकडे अडलेला – नडलेला कोणीही गेला तरी तो रिकाम्या हाती परतत नाही. आजकाल लोकांकडे पैसा हा जरी भरपूर असला किंवा श्रीमंती ही उपजत जरी असली तरी त्यातून काही हिस्सा हा दातृत्वाच्या रूपाने देण्याची दानत क्वचित व्यक्तिमत्त्वाकडे असते. त्यातीलच एक दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणजे युवकांचा हा आवडता नेता विशाल प्रभाकर परब होय.

‘विशाल’ सांस्कृतिक कार्यक्रमांनी सिंधुदुर्गचा वाढवला मान!

विशाल परब हे गेली काही वर्ष सतत समाजकारणात सक्रिय आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी राबविलेले सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम म्हणजे सिंधुवासियांसाठी पर्वणीच. आपल्या जनतेच्या मनोरंजन आणि प्रबोधनासाठी नेहमीच विशाल परब अग्रेसर राहिले आहेत. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील कुडाळ येथे त्यांच्या माध्यमातून संपन्न झालेले शिवराय महानाट्य हे सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक इतिहासातील एक आगळं वेगळं वैशिष्ट्य ठरलं आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना तब्बल दोन वेळा सिंधुदुर्गच्या जनतेसाठी व आध्यात्मिक प्रबोधनासाठी विशाल परब यांनी जिल्ह्यात आणले. जागतिक पातळीवर आघाडीचा गायक म्हणून नावारूपास आलेला ज्यूबीन नौटियालचा ‘लाईव्ह कन्सल्ट’ आणि अलीकडेच अध्यात्म आणि नाविन्यपूर्ण संगीताचा खजिना असलेला ‘अभंग रिपोस्’ अशा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विशाल परब हे युवकांना आणि युवतींना आपल्याकडे वळविण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत. एवढेच नव्हे तर मोबाईल जगताप हरपलेल्या युवा वर्गाला मैदानावर खेळण्यासाठी प्रवृत्त करण्यातही विशाल परब अग्रसर आहेत आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून युवकांना आपल्या अंगी असलेले क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी देखील युवा नेते विशाल परवांच्या माध्यमातून मिळाली वेंगुरला येथील वॉलीबॉल स्पर्धा ही प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली आणि त्याचे श्रेय विशाल परब आणि त्यांच्या टीमला जाते.

 

आरोग्यालाही दिली नवसंजीवनी! –

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. अशा परिस्थितीत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ ‘सेवा पंधरवडा’ साजरा करत असताना फिरता दवाखाना हा एक अभिनव उपक्रम विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघात राबविण्यात आला. फिरता दवाखान्याच्या माध्यमातून हजारो रुग्णांना क्षणार्धात आपल्या विविध आरोग्याच्या चाचण्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आणि विशाल परब नावाचं वादळ वाडीवस्तीत पोहोचले ते विधायक उपक्रमातून. सध्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा 2024 सालचा वाढदिवस युवा नेते विशाल परब यांनी आरोग्यमयरित्या साजरा केला. सावंतवाडी मतदार संघातील जनतेसाठी त्यांनी रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले हा दिमाखदार सोहळा सावंतवाडीचे हृदय असलेल्या मोती तलावाच्या काठी संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर विशाल नावाचं एक युवा नेतृत्व जनमाणसांच्या मनात रुजले गेले हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. मात्र हे सगळं होत असताना जेव्हा भारतीय जनता पार्टी कडून महायुतीची घोषणा झाली. म्हणून विशाल परब यांना विधानसभा निवडणूक लढू नये, असा सल्ला दिला गेला. मात्र जनतेच्या आणि विशेषत: युवकांच्या आग्रहाखातर त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवली. आपल्या प्रचारात कोणताही बडा नेता त्यांनी आणला नाही किंबहुना कष्टकरी, श्रमजीवी आणि देशाचा अन्नदाताअर्थात बळीराजा हाच माझा स्टार प्रचारक आणि आयडॉल असल्याचे प्रत्येक सभेत त्यांनी जनतेला सांगितले आणि यातूनच विशाल परब हे किती मोठ्या मनाचे आणि स्वच्छ हृदयाचे आहेत याचा प्रत्ययही मतदारसंघातील जनतेला अनुभवयास मिळाला.

टीकाकारांवर No Comments फक्त स्मित हास्य! –

विशाल परब हे अत्यंत शांत, संयमी व मितभाषी युवा नेते आहेत. विधानसभा निवडणूक असेल किंवा इतर राजकीय प्रवासात विशाल परबांच्या व्यक्तिमत्त्वावर अनेकांनी टीका केली. त्यांच्या बाबतीत कित्येक लोकांकडून टीका-टिप्पणी झाली. मात्र आपल्या कोणत्याही सभेत किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विशाल परब यांनी आजपर्यंत कोणावरही टीका अथवा ताशेरे ओढले नाहीत. फक्त ‘स्मितहास्य’ देऊन “ते माझे मार्गदर्शक आहेत. ते माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, ‘नो कॉमेंट्स’!” हाच विशाल परब यांचा स्वभाव राहिला आहे. जो आज अनेकांना आवडतोय. विशाल परब हे नेहमी सांगतात- ”मी कोणावरही टीका करणार नाही किंवा कोणावरही बोलणार नाही. मला सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझ्या युवकांसाठी आणि माझ्या जनतेसाठी विधायक आणि ठोस असं काम करायचं आहे. त्यासाठी फक्त मला हवे आहेत ते जनतेचे आशीर्वाद!” यातूनच ह्या युवा नेत्याच्या अंगी असलेली विनम्रता दिसते. ज्या विनम्रतेमुळे एक दिवस नक्कीच ‘परबांचा हा लेक ‘विशाल’ गरुडझेप घेणार!’ यात कोणतीही शंका नाही.

आज विशाल परब हे ज्या जोमाने काम करत आहेत किंबहुना त्यांची जनतेच्या सुखदुःखात जुळलेली आंतरिक ओढ नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. भविष्यात विशाल परब हे नाव केवळ सिंधुदुर्गचे नेतृत्व म्हणून न राहता उभ्या महाराष्ट्राचं आदर्श नेतृत्व म्हणून उभारी घेतील, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.!

आज संपन्न होत असलेल्या त्यांच्या जनसंपर्क सेवा कार्यालयाला टीम ‘सत्यार्थ’कडून मनःपूर्वक सदिच्छा व शुभेच्छा.!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles