कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाच्या, कणकवली महाविद्यालयात येत्या दि. १६ व १७ जानेवारी २०२६ या कालावधीत अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या राष्ट्रीय अधिवेशनात इतिहासाबरोबरचं आंतरविद्याशाखीय विषयांचे अन्य शोधनिबंध स्वीकारले जाणार असून राष्ट्रीय मान्यता प्राप्त मासिकातून ते प्रसिद्ध केले जाणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा पद्धतीचे राष्ट्रीय स्वरूपाचे अधिवेशन पहिल्यांदाच महाविद्यालयात घेण्यात येणार आहे.यानिमित्ताने कोकणातील इतिहास,कला, साहित्य व संस्कृती यांना उजाळा देण्यात येणार आहे.या राष्ट्रीय परिषदेत प्राध्यापक,शिक्षक व कोणत्याही अभ्यासकांना सहभागी होऊन इतिहास संस्कृती, लोककला व आंतरविद्याशाखीय शोधनिबंध सादर करता येतील.या निमित्ताने कोकणातील इतिहास, संस्कृती, कला व साहित्य यांचा ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध व्हावे या उद्देशाने कणक ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे.
या कनक स्मरणिकेसाठी विविध महत्वपूर्ण विषयावर साहित्य मागविण्यात येत आहे.त्यात प्रामुख्याने सावंतवाडी संस्थान, कोकणातील किल्यांचा इतिहास , कोकणातील विविध चळवळी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती चळवळ, कोकणातील नाट्य, चित्रपट संस्कृती, कोकणातील कातळ शिल्प ,कोकणाचा समग्र इतिहास,स्थानिक ,इतिहास , स्त्रीवादी साहित्य आणि चळवळी, महामानवांचे व समाज सुधारकांचे कार्य,कोकणातील ग्रामनामांचा इतिहास ,लोक कला , दशावतार ,सिंधुदुर्गातील आंबेडकरी चळवळ , सिंधुदुर्गातील स्वातंत्र्य चळवळ , प्राचीन इतिहास,सिंधुदुर्गातील नररत्ने, हुतात्मा स्मारके, प्राचीन मंदिरे अन्य धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू,ठाकर जमातीची कला, कोकणातील गावरहाटी , धार्मिक व सांस्कृतिक उत्सव, कोकणातील आंबेडकरांची भाषणे,परिषदा,सभा,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थ शास्त्रीय विचार इत्यादी विषयाच्या अनुषंगाने लेख ” प्राचार्य, कणकवली कॉलेज ,कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग पिन नंबर ४१६००२ या पत्त्यावर किंवा sarthrang2022@gmail.com या ई-मेलवर “लेख पाठवण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य युवराज महालिंगे , इतिहास परिषद स्थानिक सचिव इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम, सामाजिक विज्ञान मंडळाचे सचिव डॉ. राजेंद्र मुंबरकर, कनक स्मरणिका संपादक प्रा.सीमा हडकर , प्रा.एस. आर. जाधव, प्रा.विजयकुमार सावंत, प्रा.मृणाल गावकर यांनी आवाहन केले आहे.


