कुडाळ : कुडाळ एमआयडीसीमधील ज्यांचे भूखंड वर्षानुवर्षे पडून आहेत. तिथे कोणताही उद्योग उभारला नाही, त्या भूखंड धारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. वर्षानुवर्षे भूखंड पडीक ठेवून त्यावर उद्योग का उभारला नाही?, याबद्दलचे खुलासे मागवून घ्या आणि ज्यांचे खुलासे योग्य नसतील त्यांच्याकडून ते भूखंड काढून घ्या, असे देखील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुनावले आहे.
कुडाळ MIDC असोसिएशनच्या वतीने उद्योगमंत्र्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री आ. दीपक केसरकर, माजी आ. राजन तेली, उद्योजक हणमंतराव गायकवाड, चेंबर ऑफ कॉमर्चे अध्यक्ष रवींद्र माणगावे, उद्योजक आशिष पेडणेकर, कुडाळ MIDC असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावाडेकर, ॲड. नकुल पार्सेकर, बॅरिस्टर नाथ पै संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, उद्योजक आनंद बांदिवडेकर, श्री. चव्हाण, संतोष राणे, श्री. पावसकर, कुणाल वरसकर आणि असोसिएशनचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.



