Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘या’ एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, कार पलटी, सहाजण गंभीर जखमी.

मुंबई : उपनगरातील विक्रोळी परिसरात रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहाजण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळीतील (Vikhroli) गोदरेज कंपनीच्या परिसरात ही दुर्घटना घडली. आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. मात्र, हा अपघात गाडी भरधाव वेगात असल्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

ही इनोव्हा कार रस्त्यावरुन जात असताना प्रचंड वेगात होती. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पलटी झाली. यानंतर कार काही अंतरापर्यंत फरफटत जाऊन सर्व्हिस रोडलगतच्या दुभाजकावर आदळली. यावेळी कारचा वेग इतका होती की गाडी दुभाजकाला धडकल्यानंतर तेथील स्ट्रीट लाईटचा खांबही खाली कोसळला. या अपघातानंतर जखमींना गाडीतून बाहेर काढून जवळच्या शासकीय रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles