Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

संरक्षण मंत्रालयाची अधिकृत मान्यता मिळाली, ‘भोसले सैनिक स्कूल’ राष्ट्रीय दर्जाचे सैनिकी शिक्षण देणार!: अच्युत सावंतभोंसले. ; १५ नोव्हेंबरला भूमिपूजन, नोंदणी करण्याचे आवाहन

सावंतवाडी : संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटी, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित ‘भोसले सैनिक स्कूल’ या शाळेला नुकतीच अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. या मान्यतेमुळे कोकणातील पहिले सैनिक स्कूल उभारल जात आहे. चराठे येथील भोसले नॉलेज सिटी परिसरात हे विद्यालय उभारले जात आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोंसले यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

यावेळी भोंसले सैनिक स्कूलचे चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर लेफ्ट. कर्नल रत्नेश सिन्हा तसेच जनसंपर्क अधिकारी नितिन सांडये आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. भोंसले म्हणाले, सध्या देशभरात ३३ सैनिक स्कूल्स कार्यरत असून या सर्व शाळांची एकत्रित प्रवेश क्षमता सुमारे ३,११७ विद्यार्थ्यांची आहे. देशात सैनिकी शिक्षणाच्या वाढत्या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने अलीकडेच ६९ नवीन सैनिक स्कूल्सना मान्यता दिली आहे. या नवीन शाळा Public Private Partnership या मॉडेलवर कार्यरत राहणार असून त्याद्वारे देशभरात आणखी ९,६१७ प्रवेश क्षमतेच्या जागा निर्माण होतील अशा प्रकारे पारंपरिक आणि नव्याने मान्यता प्राप्त शाळांसह देशातील सैनिक स्कूल्सची एकूण प्रवेश क्षमता साधारण १२,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. दरवर्षी संपूर्ण देशभरातून जवळपास दीड लाख विद्यार्थी All India Sainik School Entrance Examination (AISSEE) देतात. परंतु, उपलब्ध जागा अत्यल्प असल्याने या संस्थांमध्ये प्रवेश मिळविणे अत्यंत स्पर्धात्मक व प्रतिष्ठेचे मानले जाते. सैनिक स्कूल्स या केवळ शैक्षणिक संस्था नसून, लष्करी अधिकारी आणि जबाबदार नागरिक घडविणाऱ्या राष्ट्रीय दर्जाच्या संस्था आहेत. “भोसले सैनिक स्कूल” हे कोकण विभागातील भारत सरकार मान्यता प्राप्त पहिले सैनिक स्कूल ठरले आहे. हे विद्यालय चराठे येथील भोसले नॉलेज सिटी परिसरात उभारले जात आहे. येथे आधुनिक शिक्षणाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम यांचा संगम साधला जाणार आहे. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे सैनिकी शिक्षण स्थानिक स्तरावर मिळावे, हा या शाळेचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच या शाळेत प्रवेश AISSEE परीक्षेद्वारे घेतला जाईल. दरवर्षी सहावी आणि नववी इयत्तेत प्रवेश देण्यात येईल. शाळेची एकूण प्रवेश क्षमता १६० विद्यार्थ्यांची असून त्यापैकी ४० जागा विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत. त्यामुळे भोसले सैनिक स्कूल है कोकणातील पहिले सहशिक्षणात्मक सैनिक स्कूल ठरणार आहे. विद्यार्थिनींसाठी असलेला हा आरक्षित कोटा महिला सबलीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असून मुलींनाही समान दर्जाचे सैनिकी प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती आणि नेतृत्त्वगुण विकसित करण्याची संधी मिळणार आहे. भोसले सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, धाडस, आत्मविश्वास, स्वावलंबन, नेतृत्वगुण, शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव यांचा विकास होईल. हे विद्यालय विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकदृष्ट्‌या सक्षम न करता त्यांच्यातील नेतृत्वक्षमतेला घडविण्याचे कार्य करेल. या शाळेच्या स्थापनेमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा आणि कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणासाठी दूरवर जाण्याची गरज उरणार नाही. स्थानिक विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातच राष्ट्रीय दर्जाचे निवासी शिक्षण आणि सैनिकी प्रशिक्षण मिळेल, ज्यामुळे या भागातील निद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि इतर संरक्षण सेवांमध्ये प्रवेश मिळविण्याच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील. भोसले सैनिक स्कूलचा कॅम्पस अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज केला जाणार आहे. येथे शैक्षणिक इमारती, ट्रेनिंग ब्लॉक्स, हॉस्टेल्स, ड्रिल ग्राउंड, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इत्यादींची उभारणी सुरू आहे. भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभाचे आयोजन शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी आयाजित करण्यात आले असून त्यानंतर औपचारिक प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, ले. कर्नल रत्नेश सिन्हा म्हणाले, भोसले सैनिक स्कूल हे केवळ एक शैक्षणिक केंद्र नसून “भविष्यातील सैन्य अधिकारी आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे ध्येयस्थान” आहे. कोकणातील या पहिल्या सैनिक स्कूलद्वारे श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीने संपूर्ण जिल्हा, कोकण आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात एक नवे सुवर्णपान लिहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच उद्या दिनांक ९ नोव्हेंबर ही तारीख एंटरन्स इक्झामची शेवटची तारीख असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles