- ✍️ साबाजी परब.
- सावंतवाडी : शहराचे एक महत्वाचे वैभव समजले जाणारे नरेंद्र डोंगर हे पर्यटकांना आकर्षित करणारे आणि वन्य प्राणी आणि पशुपक्षी यांची अतिशय नयनरम्य अशी अनुभूती देणारे एक पर्यटन स्थळ आहे. मात्र सध्या या पर्यटन स्थळाकडे पर्यटकांपेक्षा मद्यपींचा अधिक कल असल्याचे स्पष्ट होत आहे. याचे कारण म्हणजे नरेंद्र डोंगरावरील गार्डनकडे जात असताना कमानीजवळ असलेल्या वनविभागाच्या चौकीजवळच असलेल्या कचरा कुंडीत असंख्य दारू बाटल्यांचा खच असल्याचे ‘सत्यार्थ’च्या निदर्शनास आले आहे. यामुळे त्याठिकाणी ड्युटीवर असलेले वनविभागाचे कर्मचारी नेमके तरी करतात काय? जर मद्यपी व्यक्ति वनविभागाच्या चौकीजवळच असलेल्या कुंडीत येऊन दारूच्या बाटल्या टाकत असतील तर ते दारू घेऊन नेमके तेथून वरच्या दिशेने कसे जातात?, हाही मोठा प्रश्न आहे. आणि विशेष म्हणजे जर ते गार्डनच्या दिशेने वर जाऊन दारू पीत असतील आणि खाली परत येताना चौकीजवळ असलेल्या कुंडीतच दारूच्या रिकाम्या बाटल्या येऊन टाकत असतील तर नेमके वन विभागात कार्यरत असलेल्या चेक नाक्यावर तैनात वनविभागाचे कर्मचारी नेमके करतात काय?, असाही प्रश्न सामान्य पर्यटकांनी उपस्थित केला आहे.
- दरम्यान या सर्व गोष्टींमुळे परिवारासोबत नरेंद्र डोंगराची सफर करावी की नाही? असाही प्रश्न अस्सल पर्यटन करणाऱ्या पर्यटकांसमोर उपस्थित होतोय.
‘सत्यार्थ वॉच’ – नरेंद्र डोंगरावर दारू बाटल्यांचा खच! ; वन विभागाच्या चेक नाक्याजवळची कचरा कुंडी दारू बाटल्यांनी ओवर फ्लो!, वन कर्मचारी नेमकं करतात तरी काय?
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


