कुडाळ : श्री देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ जांभवडे बामणवाडी ता. कुडाळ या मंडळाच्या वतीने दरवर्षी तुलसी विवाह निमित्ताने दरवर्षी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षीही मंडळाच्या वतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत सौ अनघा संतोष चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सौ. सोनाली शैलेश तर्फे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केली. सौ. रुचा राजेंद्र सावंत यांनी प्राप्त केली. उत्तेजनार्थ म्हणून सौ. गीता संतोष कदम यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेत एकूण आठ स्पर्धेकांनी सहभाग घेतला. मंडळाच्या वतीने रांगोळी स्पर्धा, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम,तरुणांसाठी स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम,मोफत चहा वाटप, गृहोपयोगी साहित्य वाटप हे उपक्रम राबविले जातात. रांगोळी स्पर्धेचे परिक्षण सुप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रसाद राणे, श्री. समीर चांदरकर, श्री. दिनेश मेस्री यांनी केले.

(फोटो – सौ. अनघा संतोष चव्हाण यांनी रेखाटलेली सुबक रांगोळी.)

(फोटो – सौ. सोनाली शैलेश तर्फे यांनी रेखाटलेली सुरेख रांगोळी.)
यशस्वी स्पर्धकांचे मंडळाचे अध्यक्ष श्री संजय तर्फे, सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे, उपाध्यक्ष श्री. अरुण सावंत खजिनदार श्री. संजय साळगावकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री विठ्ठल भोगले, सचिव श्री. मोहन कदम, खजिनदार श्री अविनाश तर्फे, सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे तरुण क्रियाशील कार्यकारिणी सदस्य श्री. शैलेश तर्फे यांनी विशेष प्रयत्न केले.


