✍️रूपेश पाटील.
दोडामार्ग : ज्या सामान्य जनतेच्या न्याय हक्क आणि जाणीवांसाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्याच जाणिवेतून आजही सच्चे शिवसैनिक प्रामाणिक काम करत आहेत. अनेकदा जेव्हा अपघात होतो किंवा कोणतीही दुर्घटना घडते, तेव्हा सर्वप्रथम रस्त्यावर येतो तो बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक. असाच एक हाडाचा शिवसैनिक म्हणून सदैव जनसामान्यांच्या सुखदुःखात खंबीर उभे राहतात ते ते नाव म्हणजे ठाकरेंचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी.
रस्त्यावर कोणताही वाईट घटना अथवा अपघाती प्रसंग घडला असेल तर त्या ठिकाणी जात – पात, धर्म – पंथ हे अजिबात न पाहता केवळ ‘माणूस’ म्हणून त्यांच्या हाकेला धावणारे हक्काचे व आपुलकीचे व्यक्तिमत्व म्हणजे ‘बाबुराव धुरी’ हे नाव ओळखले जाते. असाच एक प्रत्यय नुकताच दोडामार्ग येथे त्यांच्या वागण्याने नागरिकांना अनुभवास मिळाला.
दोडामार्ग शहरात धाटवाडी येथे झालेल्या अपघातात एक व्यक्ती झाडावरून पडून गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक व समन्वयक भिवा गवस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमी व्यक्तीस गोवा मेडिकल कॉलेजमध्ये तात्काल दाखल केले. स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या या तत्परतेचे कौतुक केले असून त्वरित प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.


