बांदा : बांदा येथील सौ. गौरी सावंत – बांदेकर यांच्या वतीने आयोजित ‘दीपसुंदरी स्पर्धा २०२५’ या खास विवाहित महिलांसाठी घेण्यात आलेल्या आगळ्या-वेगळ्या फोटो स्पर्धेत सावंतवाडी येथील सौ. स्नेहा कुडतरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक सावंतवाडीच्या सौ. स्मिता वैभव केंकरे यांनी मिळविला, तर तृतीय क्रमांक दोडामार्ग येथील सौ. प्राची सावंत यांच्या नावावर राहिला.
सर्वाधिक फॉलोवर्स आणि व्हिव्हर्स मिळवत विशेष लक्ष वेधून घेतल्याबद्दल सावंतवाडीच्या सौ. मिताली राऊळ यांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच,
उत्तेजनार्थ म्हणून खालील स्पर्धकांची निवड करण्यात आली :
सौ. रीना पाटील, सौ. प्रज्ञा अरोस्कर, सौ. विद्या आंब्रे, सौ. स्मिता नलावडे, सौ. प्रणाली रेडकर आणि सौ. उत्कर्षा परब.
या स्पर्धेचे परीक्षण नितीन बांदेकर आणि सौ. प्रणिता सावंत यांनी केले. यंदा स्पर्धेत तब्बल 37 विवाहित महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांना तसेच सर्व स्पर्धकांना आयोजक सौ. गौरी सावंत – बांदेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


