सावंतवाडी : तब्बल १५० पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असलेली आणि भारतात क्रमांक एक स्तरावर असलेली जगातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना म्हणजे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ होय. या जागतिक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १५ व १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील विठूनगरी अर्थात पंढरपूर येथे संपन्न होत आहे.


महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पत्रकार बांधव या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाने हे दोन दिवशीय अधिवेशन संपन्न होणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आदर्श पत्रकार पुरस्कार देखील अधिवेशनाच्या दरम्यान दिले जाणार आहेत.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संघटनेचे उत्तम कार्य सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पदाधिकारी बांधव या अधिवेशनात सहभागी होणार आहेत, असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
चलो पंढरपूर! चलो पंढरपूर!! चलो पंढरपूर!!!
🗓️ १५ व १६ नोव्हेंबर २०२५
📍 पंढरपूर
🎙️ ‘मीडियाची वारी पांडुरंगाच्या दारी!’
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील सत्य, संघर्ष आणि सेवा याचा वारसा जपणाऱ्या पत्रकारांची पावलं आता वारीला निघालीत —
व्हॉईस ऑफ मीडिया राज्य अधिवेशन २०२५, पंढरपूर
या भव्य सोहळ्यात सहभागी व्हा आणि पत्रकारितेच्या नव्या युगाचा साक्षीदार बना!
📸 सत्याची लेखणी अन् कॅमेराच्या नजरेतून समाजाचा आरसा…
हीच आमची वारी, हीच आमची जबाबदारी!


