सावंतवाडी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत विशेषत: नगरपरिषद या व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीत चर्चा विनिमय जोरात सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी काल सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. आता ह्याच पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक सुरू असून येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी हे दाखल झाले आहेत.
युतीच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय येण्याची अपेक्षा आहे. मात्र या बैठकीत नेमके काय ठरते? यावर सगळं अवलंबून आहे.
दरम्यान माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी महायुती होणार, असे विधान दोन दिवसांपूर्वी केल्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


