कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते तसेच जनतेच्या भेटीगाठी घेणार आहेत.
दरम्यान आगामी निवणुकांमध्ये ‘महायुती’बाबत उद्या ठोस तोडगा निघण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.


