वेंगुर्ला : येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक कावले ह्यांच्या मातोश्री कै. अन्नपूर्णा लक्ष्मण कावले (राहणार – रामघाट रोड, वेंगुर्ला.) यांचे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी वेंगुर्ला, राम घाट रोड येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. रेडी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा नोकरी निमित्ताने ठाणे स्थित श्री. निलेश राणे यांचे मोठे भावोजी अशोक कावले यांच्या त्या आई होत. त्यांच्या निधनाने सामाजिक स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.



