कणकवली ; येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील कनिष्ठ भागात कार्यरत असलेले प्रा. कांतीलाल गुरुबा जाधवर यांचे आज पहाटे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. सन १९९६ पासून ते कणकवली महाविद्यालयात रसायनशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत होते. तसेच ते कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
मागील दीड महिन्यांपासून त्यांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.
अत्यंत शोकाकुल वातावरणात वालवड ता. बार्शी येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई ,पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.
प्रा. कांतीलाल जाधवर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, शिक्षक , सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी हळहळ व्यक्त केली आहे.


