Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आता राजकीय स्टंटबाजी, घोषणा नकोचं, युवकांचे जीव वाचवा.! ; मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परबांचा रोखठोक सवाल.

कुडाळ :  सत्ताधारी पक्षाचे दोन जिल्हाचे सुपुत्र जबाबदार मंत्री ॲम्बुलन्स लोकांर्पण सोहळ्यात मग्न असताना, दुसरीकडे अपघातग्रस्त अत्यावस्त रुग्णांना मात्र जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचा काही उपयोग होताना दिसत नाही. हे कशाचे द्योतक आहे? यालाच जिल्ह्याचा विकास म्हणायचा का ? आता राजकीय स्टंडटबाजी,घोषणा बंद करून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारा अन्यथा प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल.

कुडाळ मधील बावीस वर्षीय युवकाचा काल रोजी आकेरी येथे मोटरसायकल अपघात झाला. स्थानिकांच्या मदतीने जवळच्या खाजगी रुग्णालयात त्याला हलवण्यात आले. युवक अत्यावस्थ जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून ,पुढील उपचारासाठी त्याला बांबोळी गोवा येथे हलवण्याचे सांगण्यात आले. रात्रौ बारा/ एकच्या दरम्याने कार्डिओ ॲम्बुलन्सची गरज होती. परंतु जिल्ह्यातील दोन खाजगी कार्डिओ ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्या नाहीत. सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु होते. पण चार-साडेचार च्या सुमारास त्या बावीस वर्षे युवकाला आपले प्राण गमावे लागले. नुकताच व्हेटर्नरी डॉक्टर झालेल्या या युवकास वडिलांनी मेहनत करून शिक्षण दिले होते. त्याला खाजगी कंपनीत नोकरी लागलेली , उद्या रोजी तो मुंबईला कामावर हजर होणार होता. कुटुंबाचा आधार होवु पहाणार्‍या युवकास मात्र आरोग्य यंत्रणेचा फटका बसला . घरची परिस्थिती जेमतेम असणार्या कुटुंबाला याचा मोठा धक्का बसला आहे.
त्यामुळे मंत्र्यांनी गोवा बांबुळी जाण्यासाठी ॲम्बुलन्स चे राजकीय स्टंट आणि फुकट्या योजना लादण्यापेक्षा जिल्हावासीयांना हव्या असणाऱ्या मूलभूत गरजांकडे ध्यान द्यावे. आरोग्य यंत्रणे विषयी सर्वच पक्षांनी ,सामाजिक कार्यकर्त्यांनी बोंबा मारून सुद्धा ती सक्षम आणि सुदृढ, परिपूर्ण करणे अत्यावश्यक असताना, राजकीय स्टेटमेंट, स्टंटबाजी आणि फुकट योजनांवर सामान्य लोकांचा पैसा सरकार फुकत आहे… सरकार आपल्या दारी सारख्या कार्यक्रमातून कोट्यावधी रुपये खर्च केले गेले. याचा खरंच सामान्य लोकांना फायदा झाला का??? त्याऐवजी आरोग्य यंत्रणा सक्षम केल्या असत्या तर आज बांबोळी सारख्या हॉस्पिटल जिल्हा वासियांना अवलंबून राहण्याची वेळ आली नसती. गोरगरिबांचे प्राण वाचले असते.
एकीकडे युवकांना जर्मनीला नेऊन रोजगार देण्याच्या वल्गना केल्या जातात. युवकांना जर्मनीला नेऊन तुम्ही रोजगार देणार म्हणजे तुम्ही राज्यकर्ते बिनकामाचे, अकार्यक्षम आणि सक्षम नाहीत हे दाखवून देत आहात. त्यांना इथे रोजगाराची गरज आहे.ते तुम्ही देवु शकत नाहीत. आगामी विधानसभेसाठी हे सर्व योजना, स्टेटमेंट अस्तित्वात नसणारे प्रकल्प ही सर्व फसवणूक आपण करत आहात.. विधानसभेला जिल्ह्यात भाशिंग बांधून तयार असणाऱ्या सर्व उमेदवारांनी जिल्ह्यातील आरोग्य प्रश्नी आपण काय करणार??? ही भूमिका पहिल्यांदा मांडा. लोक मागत नाही ते तुम्ही फुकट वाटतायत .. लोकांना कायमस्वरूपी रोजगार द्या त्यांचे हात बळकट करा. फुकटची सोय करून लोकांना कामचुकार नका बनवू . पैसा सामान्य टॅक्स पेयर माणसाचा आहे. याचे भान ठेवा. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. शासकीय कर्मचारी पगार न दिल्यास काम बंद आंदोलने करतील. महागाई वाढेल आणि शेवटी सामान्य माणसाला याचा मनस्ताप होणार आहे. हे ध्यानात घ्या अशा कडक शब्दात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी या सर्व घडामोडींवरती नाराजी व्यक्त केली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles