सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी मळगाव व शुभांगी ऑप्टिक्स सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथील पेडणेकर सभागृह येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ८५ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली तर त्यांना अत्यल्प दरात चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन शुभांगी ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर ऑप्टोमेट्रिस्ट सचिन हरमलकर यांच्या हस्ते शिव छत्रपतींच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी माजी सभापती राजेंद्र परब, मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, विजयानंद नाईक, भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव, शक्ती केंद्र प्रमुख निळकंठ बुगडे, ऑप्टोमेट्रिस्ट नितिन हरमलकर, सौ.स्नेहल हरमलकर, विष्णू तेंडुलकर, श्रावणी शिरोडकर, बुथ अध्यक्ष सुखदेव राऊळ, प्रकाश जाधव, रुपेश सावंत, एकनाथ गावडे, ग्राम पंचायत सदस्या अनुजा खडपकर , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटकर आदी उपस्थित होते.
या शिबिरात एकूण ८५ जणांची कम्प्युटराईज्ड नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच मोतीबिंदूंची देखील तपासणी करण्यात आली. या सर्व जणांना अत्यल्प दरात चष्म्यांचे वाटप देखील करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना मोतीबिंदू निदर्शनास आला आहे त्यांची मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शुभांगी ऑप्टिक्सचे प्रोप्रायटर सचिन हरमलकर तसेच माजी सभापती राजू परब यांनी दिली.


