सावंतवाडी : डॉ. पूजा पाताडे यांची वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी वर्ग १ या पदावर सावंतवाडीतील शासकीय रुग्णालयात नियुक्ती झाली असून त्या दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी तिथे रुजू होत आहेत. ही बाब सिंधुदुर्गवासियांसाठी खूप गौरवास्पद आणि अभिमानास्पद आहे. पूजा हीचे पती आरटीओ या पदावर कार्यरत आहेत.
पूजा पाताडे यांचे वडील श्री. श्याम दाजी पाताडे हे चतुर्थश्रेणी कर्मचारी एस. एम. हायस्कूल कणकवली प्रशाळेतून निवृत्त झाले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. तीनही मुलांना त्यांनी उच्च शिक्षण विपरीत आणि हलाखीची परिस्थिती असतानाही सर्व संकटाचा सामना करीत तीनही मुलांना सक्षम बनवले आहे. आज त्यांची दोन मुले डॉक्टर आहेत. डॉक्टर मुलाचा स्वतःचा दवाखाना आहे. त्यांची सुनबाई सुद्धा डॉक्टर आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी इर्षेला पेटला तर काय करू शकतो, याचे हे खूप सुंदर उदाहरण आहे.
श्री. शाम पाताडे यांच्या दोन्ही डॉक्टर मुलांचे विवाह सिंधुरत्न वधू-वर ग्रुप निःशुल्क सेवा (सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग यांचा उपक्रम)) या माध्यमातून जुळून आली आहेत. सिंधुधुरत्न वधुवर ग्रुपतर्फे त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचाळीस शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या, असे श्री रविकिशोर चव्हाण यांनी कळविले आहे.


